• 211
  • 1 minute read

‘वर्षां’वर शिवसेनेच्या सुकाणू समितीची बैठक, निवडणूक आयोगाची कारणे दाखवा नोटीस

‘वर्षां’वर शिवसेनेच्या सुकाणू समितीची बैठक, निवडणूक आयोगाची कारणे दाखवा नोटीस

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शनिवारी शिवसेनेच्या सुकाणू समितीची बैठक ‘वर्षां’ बंगल्यावर पार पडली. या बैठकीस शिवसेनेचे मंत्री, आमदार तसेच नेतेही उपस्थित होते. या बैठकीवरून वादंग निर्माण झाला आहे. काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सचिन सावंत यांनी याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असून आचारसंहिता भंगाची कारवाई करण्याची मागणी केली आहे. 

मुख्यमंत्र्याच्या शासकीय निवासस्थानी ‘वर्षां’वर होत असलेल्या राजकीय बैठकांची निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. आयोगाच्या आदेशानुसार मुंबई जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या खासगी सचिव आणि विशेष कार्यअधिकारी यांना नोटिसा पाठविल्या असून त्यांचा खुलासा आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकिलगम यांनी सोमवारी दिली.

त्याची दखल घेत आयोगाने लगेच मुंबई शहर जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना तातडीने कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार जिल्हा निवडणूक अधिकारी रवि कटकधोंड यांनी मुख्यमंत्र्याचे खासगी सचिव अमोल शिंदे आणि विशेष कार्यअधिकारी व मुलाखत कक्षाचे प्रमुख नितीन दळवी यांना नोटीस बजावत या बैठकीबाबतचा खुलासा मागवल्याची माहिती सूत्रांनी दिली

0Shares

Related post

शूद्र शिवशंकर सिंह यादव : संक्षिप्त जीवन परिचय के साथ कुछ यादगार अनुभव*

शूद्र शिवशंकर सिंह यादव : संक्षिप्त जीवन परिचय के साथ कुछ यादगार अनुभव*

शूद्र शिवशंकर सिंह यादव : मैं अपने खानदान का पहला व्यक्ति था, जो पढ़ाई शुरू किया…
शेल्स देशाचा नागरी सन्मान सहा ॲम्ब्युलेन्सच्या बदल्यात मिळाला , तर इंडोनेशियाचा पुरस्कार कशाच्या बदल्यात मिळाला …..?

शेल्स देशाचा नागरी सन्मान सहा ॲम्ब्युलेन्सच्या बदल्यात मिळाला , तर इंडोनेशियाचा पुरस्कार कशाच्या बदल्यात मिळाला …..?

ढासळत चाललेल्या प्रतिमेच्या डागडुजीसाठी विदेशी पुरस्कार मिळविण्याचा सपाटा सुरू…..!          देश गंभीर संकटात…
काँग्रेसने केलेला विकास अतिवृष्टीत साक्ष देत उभा, तर भाजपने केलेला विकास कोसळतोय , खड्ड्यांमध्ये दम तोडतोय ….!

काँग्रेसने केलेला विकास अतिवृष्टीत साक्ष देत उभा, तर भाजपने केलेला विकास कोसळतोय , खड्ड्यांमध्ये दम तोडतोय…

देवेंद्र फडणवीस राजकारणात आल्याने महाराष्ट्र एका प्रभावशाली कथा वाचकाला मुकला…..!            …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *