• 167
  • 1 minute read

‘छावणी’ या अर्जुन डांगळे यांच्या अमृत महोत्सवी गौरव ग्रंथाचे प्रकाशन व चर्चा

‘छावणी’ या अर्जुन डांगळे यांच्या अमृत महोत्सवी गौरव ग्रंथाचे प्रकाशन व चर्चा

मुंबई – प्रतिनिधी- कर्मवीर दादासाहेब गायकवाड सांस्कृतिक केंद्र, मुंबई व सायन पब्लिकेशन प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने छावणी या अर्जुन डांगळे यांच्या अमृत महोत्सव गौरव ग्रंथाचे प्रकाशन व चर्चा आयु. विजय जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेली आहे. याप्रसंगी प्रमुख वक्ते सुभाष देसाई, दिनकर गांगल, डॉ. मनोहर जाधव व डॉ. प्रज्ञा दया पवार हे उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम शनिवार, दि. १५ जून २०२४ रोजी सायंकाळी ०५:३० (साडेपाच वाजता) सम्राट अशोका हॉल, पहिला मजला, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी भवन, चार बंगला, लोखंडवाला रोड, अंधेरी – पश्चिम, मुंबई येथे आयोजीला आहे. या कार्यक्रमास विशेष अतिथी डॉ. महेंद्र भवरे, डॉ. सुनील अवचार, किशोर मेढे (संपादक) व नितीन कोतापल्ले (सायन पब्लिकेशन प्रायव्हेट लिमिटेड) हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास जनतेने आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन केंद्राचे सरचिटणीस आयु. चंद्रकांत बच्छाव यांनी केले आहे. जी

0Shares

Related post

सीवूड्स येथील लुम्बिनी बुद्ध विहारात मुलांचा ‘विशेष वर्षावास कार्यक्रम’ उत्साहात संपन्न

सीवूड्स येथील लुम्बिनी बुद्ध विहारात मुलांचा ‘विशेष वर्षावास कार्यक्रम’ उत्साहात संपन्न

सीवूड्स येथील लुम्बिनी बुद्ध विहारात मुलांचा ‘विशेष वर्षावास कार्यक्रम’ उत्साहात संपन्न नवी मुंबई, दि. ७ (प्रतिनिधी):बौद्धजन…
४९० आदिवासी वसतिगृहातील आदिवासी विद्यार्थ्याना संघ – भाजपचे फुट सोल्जर्स बनविण्याचे कारस्थान ….

४९० आदिवासी वसतिगृहातील आदिवासी विद्यार्थ्याना संघ – भाजपचे फुट सोल्जर्स बनविण्याचे कारस्थान ….

विद्यार्थ्यांना संघी (ब्राह्मणी हिंदू ) बनविण्यासाठीच मानकर ट्रस्टचा महाराष्ट्रातील आदिवासी वसतिगृहात उपक्रम – डॉ. संजय दाभाडे…
१ सप्टेंबरला अभिमन्यु बनून मुंबईत घुसा व मराठा आरक्षणाचा चक्रव्युह तोडूनच बाहेर पडा! – रविन्द्र सोलनकर, धोंडू मानकर, सचिनदादा माळी

१ सप्टेंबरला अभिमन्यु बनून मुंबईत घुसा व मराठा आरक्षणाचा चक्रव्युह तोडूनच बाहेर पडा! – रविन्द्र सोलनकर,…

जरांगेने मुंबई ठप्प करून ओबीसींचे आरक्षण लुबाडले, आता हाके मुंबई ठप्प करून आरक्षण परत मिळवतील! दलित-ओबीसींना…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *