• 123
  • 1 minute read

धुळे जिल्हा न्यायालयात वकिलांचे लाल फीत लावून कोर्ट कामकाज

धुळे जिल्हा न्यायालयात वकिलांचे लाल फीत लावून कोर्ट कामकाज

वकिलांवरील हल्ल्यांचा निषेध — वकील संरक्षण कायदा तातडीने पारित करण्याची मागणी

धुळे, दि. ३ नोव्हेंबर (यूबीजी विमर्श-संहिता)
         राज्यात वकिलांवरील वाढत्या हल्ल्यांचा निषेध नोंदवत आज धुळे जिल्हा न्यायालयात वकिलांनी लाल फीत लावून कोर्ट कामकाज केले. बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा च्या आवाहनानुसार जिल्ह्यातील सर्व वकिलांनी एकजुटीने शांततेत आंदोलन केले.
वकील संघाचे अध्यक्ष ॲड. राहुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वकिलांनी न्यायालयीन परिसरात “वकील संरक्षण कायदा पारित झालाच पाहिजे” अशी मागणी करत अध्यक्ष ॲड.राहुल पाटील यांनी आपली भूमिका ठामपणे मांडली. या आंदोलनादरम्यान कोणत्याही न्यायालयीन कामकाजात अडथळा न आणता वकिलांनी नियमित उपस्थिती दर्शवून प्रतीकात्मक निषेध नोंदवला.
यावेळी वकिलांनी सांगितले की, राज्य शासनाने वकिलांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र कायदा तातडीने लागू करावा, अन्यथा पुढील काळात तीव्र आंदोलन छेडले जाईल.
या प्रसंगी वकिलांनी शेवगांव (अहिल्यानगर) येथील वकिलावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध करत, अशा घटना थांबवण्यासाठी पोलीस प्रशासनाने तात्काळ पावले उचलावीत, अशी मागणी केली.धुळे जिल्हा न्यायालय परिसरात आजचा दिवस “लाल फीत आंदोलन” या स्वरूपात पार पडला आणि संपूर्ण न्यायालय परिसरात एकजुटीचा संदेश दिला गेला.
यावेळी धुळे जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष राहुल पाटील,जेष्ठ विधीज्ञ ॲड.दिलीप पाटील,ॲड.शामकांत पाटील,ॲड. जितेंद्र निळे,ॲड. विजय रवंदळे,ॲड.हितेश कबाडे,ॲड.राहुल भामरे,ॲड.नितीन जाधव,ॲड.प्रशांत चौधरी,ॲड.सचिव बळीराम वाघ,ॲड.सचिव उमेशकांत पाटील,कार्यकारणी सदस्य ॲड. उमाकांत घोडराज
,पदाधिकारी,जेष्ठ विधिज्ञ व सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

0Shares

Related post

सीवूड्स येथील लुम्बिनी बुद्ध विहारात मुलांचा ‘विशेष वर्षावास कार्यक्रम’ उत्साहात संपन्न

सीवूड्स येथील लुम्बिनी बुद्ध विहारात मुलांचा ‘विशेष वर्षावास कार्यक्रम’ उत्साहात संपन्न

सीवूड्स येथील लुम्बिनी बुद्ध विहारात मुलांचा ‘विशेष वर्षावास कार्यक्रम’ उत्साहात संपन्न नवी मुंबई, दि. ७ (प्रतिनिधी):बौद्धजन…
४९० आदिवासी वसतिगृहातील आदिवासी विद्यार्थ्याना संघ – भाजपचे फुट सोल्जर्स बनविण्याचे कारस्थान ….

४९० आदिवासी वसतिगृहातील आदिवासी विद्यार्थ्याना संघ – भाजपचे फुट सोल्जर्स बनविण्याचे कारस्थान ….

विद्यार्थ्यांना संघी (ब्राह्मणी हिंदू ) बनविण्यासाठीच मानकर ट्रस्टचा महाराष्ट्रातील आदिवासी वसतिगृहात उपक्रम – डॉ. संजय दाभाडे…
१ सप्टेंबरला अभिमन्यु बनून मुंबईत घुसा व मराठा आरक्षणाचा चक्रव्युह तोडूनच बाहेर पडा! – रविन्द्र सोलनकर, धोंडू मानकर, सचिनदादा माळी

१ सप्टेंबरला अभिमन्यु बनून मुंबईत घुसा व मराठा आरक्षणाचा चक्रव्युह तोडूनच बाहेर पडा! – रविन्द्र सोलनकर,…

जरांगेने मुंबई ठप्प करून ओबीसींचे आरक्षण लुबाडले, आता हाके मुंबई ठप्प करून आरक्षण परत मिळवतील! दलित-ओबीसींना…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *