• 16
  • 1 minute read

पेरियार ई. व्ही. रामासामी यांचे संपूर्ण वास्तविक चरित्र आता मराठीतही उपलब्ध…

पेरियार ई. व्ही. रामासामी यांचे संपूर्ण वास्तविक चरित्र आता मराठीतही उपलब्ध…

पेरियार ई. व्ही. रामासामी यांचे संपूर्ण वास्तविक चरित्र आता मराठीतही उपलब्ध...

          एका योद्धयामध्ये असणारी आक्रमकता ही जर एका विचारवंतामध्ये उतरली, तर तो आपली विचारांची लढाई कशी लढेल याचे उत्तम उदाहरण म्हणजे पेरियार
         इतिहासातील बहुतेक सर्वच समाजसुधारकांना आणि विचारवंतांना प्रस्तापितांकडून, सत्ताधिशांकडून तसेच समाजातील गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून प्रचंड त्रास सहन करावा लागल्याचा इतिहास आहे, पण पेरियार मात्र याला अपवाद ठरतात. उलट पेरियार यांनीच या साऱ्यांना सळो कि पळो करून सोडले होते!
         पेरियार यांनी आपली मानवतेची लढाई लढत असताना रूढी-परंपरा, जात-धर्म, धर्मग्रंथे, पुराणे, देव, ब्राह्मणवाद, राजकीय नेते, एवढेच नव्हे तर मित्र, नातेवाईक, सहकारी, गुरु, शिष्य तसेच रूढीवादी ब्राह्मण पुरोहित यांपैकी जे काही त्यांच्या वाटेवर अडथळे बनून आले त्या साऱ्यांवर आपल्या विवेकी विचारांचा दंडूक उगारला होता.
 
या पुस्तकात वाचकांना पेरियार यांच्या प्रत्येक विद्रोही कृत्यामागचे वास्तव, त्यांचं तत्वज्ञान, त्यांच्या सुधारणावादी चळवळी, त्यांची राजकीय कारकीर्द तसेच त्यांचं वैयक्तिक आयुष्य यांविषयी सविस्तर वाचायला मिळेल. सोबतच खालील प्रश्नांचीही सविस्तर माहिती मिळेल: 
 
 पेरियार दक्षिण भारत स्वतंत्र राष्ट्र म्हणून का मागत होते? 
 
 दक्षिणेचे आंबेडकर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पेरियार यांनी संविधान का जाळले होते? 
 
 स्त्रीवादी म्हणवणाऱ्या पेरियार यांनी वयाच्या सत्तराव्या वर्षी आपल्या दत्तक मुलीशी लग्न का केलं? 
 
 पेरियार यांना जगातली सर्वात मोठी नास्तिक चळवळ उभी करण्याची गरज का पडली होती? 
 
 पेरियार धर्मांतरणाचे समर्थन करत होते का?
 
 इस्लाम आणि ख्रिस्ती धर्मांबद्दल पेरियार यांचे काय विचार होते?
 
 बुद्धाच्या विचारांचे चाहते असूनही पेरियार यांनी बौद्ध धम्माची दिक्षा घेणे जरुरी का समजले नाही?
 
 रावण दहणाला दक्षिण भारतात विरोध का होतो?
 
 तमिळ भाषिक हिंदी भाषेला स्वीकारण्यास विरोध का करतात?  
 
 दक्षिण भारतात राष्ट्रीय पक्षांना पाय रोवणं अवघड का जातं? 
 
 द्रवीड जनता आपल्या नावापुढे आडनाव का लावत नाही? 
 
 दक्षिण भारतीय लोकं शिक्षणात उत्तर भारतीयांच्या पुढे कसे गेले? 
 
यांसारख्या मुद्यांवर सविस्तर वाचायला मिळेल.   
 
जगाने ज्यांना सॉक्रेटीसच्या बरोबरीचे विचारवंत मानले अशा पेरियार यांची आक्रमकता पचणी न पडल्याने त्यांच्या वैचारिक विरोधकांनी त्यांच्याविषयी अनेक मिथके पसरवली आहेत. परिणामी पेरियार या नावाभोवती कायमच बदनामीचे वादळ घोंगावत राहिले आहे. 
 
या पुस्तकात लेखकाने पेरियार यांच्या चांगल्या आणि वाईट अशा समजल्या जाणाऱ्या सर्वच पैलुंवर तटस्थपणे प्रकाश टाकून, वास्तव निरपेक्षपणे मांडले आहे. या पुस्तकाचा उद्देश पेरियार यांच्या संबंधित असलेला वास्तविक इतिहास जगासमोर आणणे हाच आहे. 
 
पेरियार यांचा वास्तविक इतिहास समग्रपणे जाणून घेण्यासाठी जरूर वाचा..
 
‘पेरियार – मिथक आणि वास्तव’ 
 
लेखक : दिपक गायकवाड 
 
पाने : ४३२ | किंमत : ४५०/-
 
उत्तम सफेद टिकाऊ पेपरवर उत्कृष्ट छपाई.
 
पुस्तक घरपोच मिळवण्यासाठी खालील ‘WhatsApp’ टॅबवर क्लिक करा.
 
अथवा
 
8806889563 या क्रमांकावर whats app किंवा call करा.
 
 
 
1Shares

Related post

IIT बॉम्बे प्रकरण: विद्यार्थ्याच्या मृत्यूमुळे वादात सापडलेल्या प्रोफेसर दूल्लांच्या भूतकाळाबद्दल धक्कादायक खुलासे; विद्यार्थ्यांनी सगळंच सांगून टाकलं

IIT बॉम्बे प्रकरण: विद्यार्थ्याच्या मृत्यूमुळे वादात सापडलेल्या प्रोफेसर दूल्लांच्या भूतकाळाबद्दल धक्कादायक खुलासे; विद्यार्थ्यांनी सगळंच सांगून टाकलं

प्रोफेसर दूल्लांच्या भूतकाळाबद्दल धक्कादायक खुलासे; विद्यार्थ्यांनी सगळंच सांगून टाकलं 18 सप्टेंबर रोजी मुंबई आयआयटी कॅम्पसमध्ये झालेल्या…
४ थ्या सम्यक साहित्य कला संगीतीच्या अध्यक्षपदी डॉ. श्रीधर पवार यांची निवड

४ थ्या सम्यक साहित्य कला संगीतीच्या अध्यक्षपदी डॉ. श्रीधर पवार यांची निवड

४ थ्या सम्यक साहित्य कला संगीतीच्या अध्यक्षपदी डॉ. श्रीधर पवार यांची निवड ४ थ्या सम्यक साहित्य…
भीमा कोरेगाव विजयस्तंभ जमीन विवाद प्रकरणात पुणे न्यायालयाच्या निकालाला राज्य सरकारने त्वरित आव्हान देणे आवश्यक – ऍड.  डॉ. सुरेश माने

भीमा कोरेगाव विजयस्तंभ जमीन विवाद प्रकरणात पुणे न्यायालयाच्या निकालाला राज्य सरकारने त्वरित आव्हान देणे आवश्यक –…

भीमा कोरेगाव विजयस्तंभ जमीन विवाद प्रकरणात पुणे न्यायालयाच्या निकालाला राज्य सरकारने त्वरित आव्हान देणे आवश्यक –…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *