- 7
- 1 minute read
उपेक्षितांचा न्याय लढा!
3waysmediadmin
February 2, 2024
Post Views: 30
उपेक्षितांचा न्याय लढा!
उपेक्षितांना चीरडतांना व्यवस्थेचे राखणदार त्यांना नेहमीच आरोपीच्या पिंजर्यात गुन्हेगार म्हणून उभे करतात.घेरुन मारतांनाही मरण्याचे अपराधीही ठरवत असतात.
पण,समतेच्या लढाईतील लढवय्यांचे काम असतं;”जे तरुण आपल्या बांधवांच्या मुक्तीसाठी सुखाची अथवा दु:खाची,मानाची अथवा अपमानाची तमा न बाळगता आपले तन,मन,धन आणि तारुण्य कुर्बान करुन टाकतात.ते तरुण धन्य होत.”या बाबासाहेबांच्या संदेशानुसार अथकपणे लढत राहणं.
आता हेच बघा ना;आंबेडकरी चळवळीतल्या शंतनु कांबळेला व्यवस्थेने नक्सलवादी ठरवुन नागपुरच्या तुरुंगात डांबलेलं.त्यावेळी नागपुरच्या वीराची अमिरी काय उतु चालली होती काय?
तोही तर शंतनुसारखाच भणंग लढवय्याच तर होता ना!
त्या न्यायालयिन लढ्यात शंतनुला जामिनावर बाहेर काढण्यापासुन ते पार निर्दोष सुटेपर्यंत वीराची साथीदारी लढवय्याची तर होतीच त्याहीपुढे एका शाहिराला दुसर्या शाहिराची ती दादही होती.
११जुलै१९९७ ला सेनाभाजपा सरकारने रमाबाई आंबेडकर नगरमधील १०आंबेडकरी युवकांना टीप्पुन मारल्या नंतर “रमाबाई आंबेडक नगर हत्याकांडविरोधी संघर्ष समिती”च्या माध्यमातुन श्याम गायकवाडांच्या सोबत मिलिंद भवार,ॲड.बी.जी.बनसोडे,उदय चौधरी,जगन्नाथ ओगले,प्रा.विठ्ठल शिंदे,ॲड.संघराज रुपवते,ॲड.राजय गायकवाड,ॲड.किरन चन्ने,सुमेध जाधव,सुबोध मोरे,संभाजी भगत आदींसह आम्ही सार्यांनी न्यायालयिन लढाईला उतरायचे ठरवुन मैदानात उतरलो होतो.
आमच्या या लढाईला श्याम गायकवाडांच्या विनंतीनुसार जेष्ठ वीधिज्ञ ॲड.प्रभाकर हेगडेंनीही एक पैसाही न घेता साथ दिली होती.एका बाजुने रमाबाई आंबेडकर नगरातील डाॅ.हरिश आहिरे,चिंतामण गांगुर्डे,विकास पवार,नामदेव उबाळे,आनंद शिंदेकर,ॲड.राजेश करमकर आदी अनेक कार्यकर्ते आमच्यासोबतच रस्त्यावरची लढाई लढत होते.त्या लढाईत कालकथित मनोहर कदम आणि दिनु रणदिवेंसह प्रतिमा जोशी,निखिल वागळे,कपील पाटील,आनंद पटवर्धन,सीमांतिनी धुरुंसह,दिवाकर शेजवळ,बंधुराज लोणे,विलास आठवले आदी अनेक पत्रकार-कार्यकर्ते ही लढाई लढत होते.
या हत्याकांडाला १०वर्षे झाल्यानिमित्त रमाबाई आंबेडकर नगर येथे “हत्याकांडविरोधी संघर्ष समिती”च्या वतीने शहिदांच्या स्मृति जागवण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमाला सरकारने पोलीस छावणीचे स्वरुप आणले होते.अत्यंत तणावाचे वातावरण सगळीकडे होते.
या शहिदांच्या रक्ताचा जमाखर्च मांडण्याच्या लढवय्या कार्यक्रमातच माझी आणि वीराची साथीदारी सुरु झाली.
वीराच्या लढवय्या जोडीसह शीतल-सचिन आणि शंतनु ही जोडीही मला भेटली होती.पुढे अनेक लढ्यांमध्ये वीरा साथीदारी निभावत राहिला.
वीरामधल्या अभिनय गुणांमुळे शंतनुच्या न्यायालयिन लढाईची पार्श्वभूमी असलेल्या, लढणार्या कार्यकर्त्याच्या व्यवस्थेसमोर होणार्या फरफटीवरील “कोर्ट” चित्रपटाने पार “ऑस्कर”च्या स्पर्धेत उतरण्यापर्यंत मजल मारली.
“कोर्ट”ला जरी तिथे नामांकन मिळू शकले नाही तरी समतेच्या लढाईतल्या एका समता सैनिकाची ऑस्करपर्यंतची झेप समतेच्या लढ्यातील कलावंतांना प्रेरणादायिच होती.
वीरा अंतिम क्षणापर्यंत संघर्षरतच राहिला.लाॅकडावुनच्या काळातही उपाशी पोटांपर्यंत अन्नाचा घास पोहचवायसाठी तो धडपडत राहिला.
कालच जेव्हा वीरा अत्यावस्थ असल्याचे कळले तेव्हाच जरा काळजी वाटत असतांना आज वीराने साथीदारी सोडल्याचे कळलेय.
अ$रे! हा काॅल कुणाचा येतोय?
मी अस्वस्थतेने मोबाईल कानाला लावतोय.
वाटत असते वीरा बोलेल;
दादा जयभीम!
पण,एक कार्यकर्ता बोलत असतो;वीरा साथीदार गेले.
साथीदार गेल्याने मी आसवं ढाळतोय.
वीरा तुला साथीदाराचा मानाचा जयभीम……!
जयवंत हिरे
0Shares