• 140
  • 1 minute read

पुण्यात १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ‘संयुक्त अभिवादन’ सोहळ्याचे आयोजन

पुण्यात १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ‘संयुक्त अभिवादन’ सोहळ्याचे आयोजन

पुण्यात १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना 'संयुक्त अभिवादन' सोहळ्याचे आयोजन

पुणे:
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त, ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती महोत्सव समिती, पुणे’ यांच्या वतीने मंगळवार, १४ एप्रिल रोजी सकाळी ०९:३० वाजता भव्य ‘संयुक्त अभिवादन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
 
या सोहळ्यात राज्य व केंद्रातील मंत्री, लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी आणि विविध क्षेत्रातील प्रमुख कार्यकर्ते एकत्र येऊन महामानवाला अभिवादन करणार आहेत.
 
प्रमुख उपस्थितांची मांदियाळी:
या कार्यक्रमाला अनेक दिग्गज नेते आणि अधिकारी उपस्थित राहणार आहेत, त्यापैकी काही प्रमुख नावे खालीलप्रमाणे:
 
मंत्री व लोकप्रतिनिधी: मा. ना. सुनेत्राताई पवार (उपमुख्यमंत्री, महा. राज्य), मा. ना. मुरलीधर मोहोळ (केंद्रीय राज्यमंत्री), मा. ना. चंद्रकांत पाटील (उच्च शिक्षण मंत्री), मा. खा. सुप्रियाताई सुळे, मा. खा. डॉ. अमोल कोल्हे, मा. खा. पार्थ पवार, मा. खा. मेधाताई कुलकर्णी यांसह पुण्याचे सर्व आमदार.
 ⁠
शासकीय अधिकारी: पुण्याचे पोलीस आयुक्त मा. अमितेश कुमार, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, महापालिका आयुक्त मा. नवलकिशोर राम, जिल्हाधिकारी मा. जितेंद्र डुडी आणि सहपोलीस आयुक्त मा. रंजनकुमार शर्मा.
राजकीय नेतृत्व: पुणे शहर अध्यक्ष – अरविंद शिंदे (काँग्रेस), धिरज घाटे (भाजप), सुनील टिंगरे (राष्ट्रवादी काँग्रेस), गजानन थरकुडे (शिवसेना यु.बी.टी), रवींद्र धंगेकर (शिवसेना) आणि श्रीकांत पाटील (नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी).
 
आयोजक:
या कार्यक्रमाचे नियोजन समितीचे मा. परशुराम वाडेकर (मा. उपमहापौर), अध्यक्ष मा. राहुल डंबाळे आणि मा. डॉ. सिद्धार्थ धेंडे (मा. उपमहापौर), नगरसेवक मा. अविनाशज राज साळवे व मा. बाळासाहेब जानराव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.
 
पुणे शहर आणि परिसरातील नागरिकांनी या अभिवादन सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जयंती महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
 
तरी सदर बातमी आपले वतिने प्रसिद्ध करणेस विनंती आहे. 
 
राहुल डंबाळे 
 
 
 
0Shares

Related post

सीवूड्स येथील लुम्बिनी बुद्ध विहारात मुलांचा ‘विशेष वर्षावास कार्यक्रम’ उत्साहात संपन्न

सीवूड्स येथील लुम्बिनी बुद्ध विहारात मुलांचा ‘विशेष वर्षावास कार्यक्रम’ उत्साहात संपन्न

सीवूड्स येथील लुम्बिनी बुद्ध विहारात मुलांचा ‘विशेष वर्षावास कार्यक्रम’ उत्साहात संपन्न नवी मुंबई, दि. ७ (प्रतिनिधी):बौद्धजन…
४९० आदिवासी वसतिगृहातील आदिवासी विद्यार्थ्याना संघ – भाजपचे फुट सोल्जर्स बनविण्याचे कारस्थान ….

४९० आदिवासी वसतिगृहातील आदिवासी विद्यार्थ्याना संघ – भाजपचे फुट सोल्जर्स बनविण्याचे कारस्थान ….

विद्यार्थ्यांना संघी (ब्राह्मणी हिंदू ) बनविण्यासाठीच मानकर ट्रस्टचा महाराष्ट्रातील आदिवासी वसतिगृहात उपक्रम – डॉ. संजय दाभाडे…
१ सप्टेंबरला अभिमन्यु बनून मुंबईत घुसा व मराठा आरक्षणाचा चक्रव्युह तोडूनच बाहेर पडा! – रविन्द्र सोलनकर, धोंडू मानकर, सचिनदादा माळी

१ सप्टेंबरला अभिमन्यु बनून मुंबईत घुसा व मराठा आरक्षणाचा चक्रव्युह तोडूनच बाहेर पडा! – रविन्द्र सोलनकर,…

जरांगेने मुंबई ठप्प करून ओबीसींचे आरक्षण लुबाडले, आता हाके मुंबई ठप्प करून आरक्षण परत मिळवतील! दलित-ओबीसींना…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *