• 66
  • 1 minute read

एलोन मस्क, स्टारलिंक, स्पेस एक्स आणि कोट्यवधी सामान्य नागरिकांच्या दैनंदिन आयुष्याला कवेत घेणारे मक्तेदार, बहुराष्ट्रीय, बिग टेक, बिग कॅपिटल…

कोट्यवधी सामान्य नागरिकांच्या दैनंदिन आयुष्याला कवेत घेणारे मक्तेदार, बहुराष्ट्रीय, बिग टेक, बिग कॅपिटल…

एलोन मस्क यांची सॅटॅलाइट ब्रॉडबँड सेवा देणारी स्टारलिंक कंपनी भारतात देखील तशाच सेवा द्यावयास पुढच्या काही दिवसांत सुरुवात करू शकेल अशी चिन्हे आहेत.  त्यासाठी आवश्यक त्या केंद्र सरकारच्या परवानग्या प्रोसेस करण्याचे काम वेगाने सुरू आहे. (बिझीनेस लाइन एप्रिल १०, २०२६ पान क्रमांक एक)
स्टार लिंक ही एलोन मस्क यांच्या मालकीच्या स्पेसएक्स (SpaceX ) या कंपनीची उपकंपनी आहे. या होल्डिंग कंपनीच्या इतरही काही उपकंपन्या आहेत. 
 
स्पेस एक्स ही होल्डिंग कंपनी येत्या जून महिन्यात अमेरिकेत आयपीओ काढण्याच्या विचारात आहे. त्यासाठी तेथील नियामक मंडळाच्या औपचारिकता पुऱ्या केल्या जात आहेत.  हा आयपिओ ७५ बिलियन डॉलर्स म्हणजे जवळपास ७ लाख कोटी रुपयांचा असेल. तो ठरल्याप्रमाणे झालाच तर त्यावेळी अमेरिकेच्या भांडवल बाजारातील आतापर्यंतचा सर्वात मोठा आय पी ओ ठरेल.  स्पेस एक्स कंपनीच्या शेअर्स साठी ठरवलेला हा बाजारभाव मिळाला तर त्या कंपनीचे बाजारमूल्य, मार्केट कॅपिटलायझेशन २ ट्रिलियन डॉलर्स म्हणजे १८० लाख कोटी असेल.   स्पेस एक्स कंपनीचे एवढे फॅन्सी बाजारमूल्य तशाच फॅन्सी पी इ मल्टिपल वर आधारित आहे: १२५ ! 
 
अमेरिकेतील इन्व्हिडिया या आघाडीच्या टेक कंपनीचे पी इ मल्टिपल २० आहे ! अर्थातच हा इश्यू या किमतीला सबस्क्राईब होईल का याबद्दल शंका व्यक्त होत आहेत.
मागच्या वर्षी स्पेस एक्स कंपनीचे उत्पन्न १६ बिलियन डॉलर्स होते आणि त्यावर तिने ८ बिलियन डॉलर्स नफा कमावला होता. 
 
या कंपनीत एलोन मस्क यांचे ४० टक्के भागभांडवल आहे. या कंपनीशिवाय त्यांच्या ज्या इतर कंपन्या, मालमत्ता आहेत त्या धरून एलोन मस्क यांची संपत्ती एक ट्रिलियन डॉलर्स होईल. हा देखील अमेरिकेतील आणि जगातील एक उच्चांक असेल. अंतराळाच्या सुरू असणाऱ्या व्यापारीकरणात मस्क यांची स्टार लिंक आघाडीवर आहे. 
या घडीला पृथ्वी भोवती जेवढे कृत्रिम उपग्रह कार्यरत आहेत त्यापैकी दोन तृतीयांश उपग्रह स्टार लिंक कंपनीचे आहेत. मागच्या वर्षी अमेरिकेतून जेवढे कृत्रिम उपग्रह अंतराळात सोडले गेले त्यापैकी ८५ टक्के उपग्रह या कंपनीचे आहेत. 
 
सर्वात लक्षणीय बाब ही की उपग्रह सोडणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्यांच्या तुलनेत स्टार लिंकचा एका उपग्रहामागील खर्च फक्त एक पंचमांश आहे. ( वरील आकडेवारी संदर्भ Scott Galloway) 
प्रगत तंत्रज्ञानावर आधारित महाग वस्तुमाल / सेवा उच्चभ्रू वर्गाच्या चंगळवादासाठी आहेत ही मागच्या शतकातील झापडबंद मांडणी आहे. 
कोट्यवधी रुपयांच्या बाजारभावाची स्पोर्ट्स कार, स्पीड बोट, अंतराळ पर्यटन आणि सामान्य लोकांच्या दैनंदिन आयुष्याला स्पर्श करणाऱ्या प्रगत तंत्रज्ञानावर आधारित वस्तू / सेवा यात फरक करावा लागेल.
सॅटेलाईट संपर्क सेवा ही दुसऱ्या प्रकारात बसणार आहे. आज नाही. पण नजिकच्या काळात. 
मोबाईल , इंटरनेट , ओ टी टी, स्मार्ट फोन , डिजिटल पेमेंट, सोशल मीडिया या सर्व सेवा मक्तेदार बहुराष्ट्रीय कंपन्याच पुरवत आहेत. आणि आपल्या सकट कोट्यवधी सामान्य नागरिक त्याचे नुसते ग्राहक नाही तर आपले दैनंदिन आयुष्याची गुणवत्ता त्यांच्यावर निर्भर झाली आहे. याचे non rhetorical अर्थ लावले पाहिजेत. 
 
आताची भांडवशाही शोषक आहेच. याबद्दल दुमत नाही. पण त्या वाक्याच्या पुढे जाण्याची गरज आहे. कारण ती प्रणाली खूप गुंतागुंतीची झाली आहे. ती नेहमीच्या बायनरीच्या चिमटीत येत नाही. म्हणून त्यामागील राजकीय अर्थव्यवस्था आणि सत्ताकारण समजून घ्यावे लागेल , मतदार नागरिकांना समजून द्यावे लागेल.  सर्वात भीतीदायक आहे या सेवांमधील मक्तेदारीकरण, त्यांच्याकडे जमा होणाऱ्या, समाजाच्या बचतीतून तयार झालेल्या , महाकाय भांडवलाची दहशत आणि अख्खी सिस्टीम स्वतःची बटिक बनवण्याची कुवत, कोट्यवधी लोकांचा डेटा त्या कंपन्यांच्या हातात जाणे आणि त्याचा होऊ शकणारा दुरुपयोग. कंपन्यांकडून आणि शासकीय सत्तेकडून 
 
संजीव चांदोरकर 
 
 
 
0Shares

Related post

इंडिया आघाडीचे नेतृत्व राहुल गांधी ऐवजी अखिलेश यादव अथवा एम. के स्टॅलिन यांच्याकडे असायला हवे…..!

इंडिया आघाडीचे नेतृत्व राहुल गांधी ऐवजी अखिलेश यादव अथवा एम. के स्टॅलिन यांच्याकडे असायला हवे…..!

विरोधकांच्या आघाडीने भक्कम पर्याय उभा केला नाही तर मोदी २०२९ मध्ये ही सत्तेत      …
नॅशनल स्टॉक एक्सचेंजची (NSE एन एस इ) आकडेवारी:  भारतीय अर्थव्यवस्थेच्या वित्तीयकरणाचा सांगावा !

नॅशनल स्टॉक एक्सचेंजची (NSE एन एस इ) आकडेवारी: भारतीय अर्थव्यवस्थेच्या वित्तीयकरणाचा सांगावा !

नॅशनल स्टॉक एक्सचेंजची (NSE एन एस इ) आकडेवारी: भारतीय अर्थव्यवस्थेच्या वित्तीयकरणाचा सांगावा ! एप्रिल २०२६ पर्यंत…

यादवों को ही धार्मिक षडयंत्र का शिकार क्यों बनाया जाता है?

आजकल हिन्दू धर्म के छ: हजार जातियों में सिर्फ यादव जाति को ही महिमा मंडित करते…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *