बदलापुरात R.P.I(R.K) च्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले जयंतीचा कार्यक्रम संपन्न झाला

बदलापुरात R.P.I(R.K) च्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले जयंतीचा कार्यक्रम संपन्न झाला

बदलापुरात R.P.I(R.K) च्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले जयंतीचा कार्यक्रम संपन्न झाला

R.P.I(R.K) पक्षाध्यक्ष मा. राजाराम खरात यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बदलापूर कार्यकारिणीच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. कार्यक्रमाच्या वेळी महात्मा ज्योतिबा फुले तसेच सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांना श्रद्धापूर्वक वंदन करण्यात आले. शिक्षणाचा अभाव हे समाजाच्या सर्व प्रकारच्या अवनती चे मूळ कारण आहे. असा मोलाचा संदेश देऊन शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. म्हणून महात्मा फुलेंनी म्हटले आहे की “विद्ये विना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले.” सदर कार्यक्रमाच्या वेळी पक्षाचे शहर अध्यक्ष मा. अशोक गजरमल, प्रा. योगेश साळवे, स्वप्निल (भाऊ) शिर्के, सुभाष रणपिसे, शुभम भोसले, तसेच बेलवली उत्कर्ष मित्र मंडळाचे सौरभ तसेच विशाल, इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
 
 
 
0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *