• 22
  • 1 minute read

भान

भान

ते सत्तेत
आहेत
हे सत्य आहे
हे मान्य केले
पाहिजे

सर्व जगात
पोहचलेल्या
बुद्धालाही
त्यांनी केले होते
अदृश्य या भूमीत

त्या तुलनेने
संविधान
त्यांच्यासाठी आहे
हातचा मळ!
म्हणून आम्ही
उगीच भ्रमात
राहू नये

आमच्या कवितेतील
सूर्य, चंद्र नि तारे
उपाशी मरू लागले
की तेही जातील
शरण त्यांना
बिनशर्त!
(किंवा जमा होतील
कबरीत)
आठवले,
कवाडे नि जाधव
जसे गेले

शब्दातील मुजोरीने
कुणीच जिंकले नाही
युद्ध आजवर
युद्धाचे रथचक्र
रक्ताच्या इंधनावर
चालत असते
याचे भान असावे
अन् उद्या होणा-या
तुंबळ युद्धासाठी
जोडत जावे माणसं
आपल्या मनातील
भिंती पलीकडचे.

– प्रा माधव सरकुंडे.

0Shares

Related post

अखिलेश व तेजस्वीने मोदीलाच सत्तेच्या राजकारणातील पर्याय म्हणून बाद केले…!

अखिलेश व तेजस्वीने मोदीलाच सत्तेच्या राजकारणातील पर्याय म्हणून बाद केले…!

भाजपसाठी योग्य नारा : 400 पार नाहीतर 40 च्या आत या देशाची लोकशाही व संविधानाला आम्ही…
एका मतामुळे वाजपेयींचे सरकार पडते तर १२ प्लस मतांची किंमत…?

एका मतामुळे वाजपेयींचे सरकार पडते तर १२ प्लस मतांची किंमत…?

अण्णा द्रमुकच्या नेत्या जयललिता यांनी वाजपेयी सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर सरकार अल्पमतात आले व विरोधकांनी सरकारच्या…
भाजपच्या मुस्लिम विरोधी राजकारणाचा प्रभाव इंडिया आघाडीवर ही असल्याने मुस्लिम समाजाला ग्रहीत धरून डावलले…!

भाजपच्या मुस्लिम विरोधी राजकारणाचा प्रभाव इंडिया आघाडीवर ही असल्याने मुस्लिम समाजाला ग्रहीत धरून डावलले…!

भारतीय संसदीय राजकारणात सर्वाँना हिस्सेदारी/ भागीदारी मिळाली पाहिजे याच भूमिकेतून अनुसूचित जाती, जमातींना राजकीय आरक्षण संविधानाच्या…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *