मोदी, शहाने शिवसेना तोडली, पण मूळ शिवसेना उद्धव ठाकरें यांचीच या जनमानसातील प्रतिमेला तोडू शकले नाहीत……!

मोदी, शहाने शिवसेना तोडली, पण मूळ शिवसेना उद्धव ठाकरें यांचीच या जनमानसातील प्रतिमेला तोडू शकले नाहीत……!

गद्दार खासदारांच्या मतदारसंघातील उद्धव ठाकरेंच्या सभांमुळे भाजपच्या सत्तेला सुरुंग.....!

           उद्धव ठाकरे सेनेच्या खासदारांना फोडण्यासाठी जे ऑपरेशन टायगर राज्यात राबविले गेले त्याची सूत्रं एकनाथ शिंदे यांच्याकडे होती, हे दिसत असले तरी वस्तुस्थिती मात्र यापेक्षा वेगळी होती. शिंदे केवळ मोदी, अमित शहा यांच्या हातातील कटपुतल्या बाहुलीसारखे ऑपरेशन टायगर घेऊन नाचत होते. या तोडफोडीची सुपारी त्यांना दिल्लीतील आकांकडून मिळाली होती व त्यांनी ती वाजविली इतकाच त्यांचा रोल. फुटलेले दोन तृतीयांश खासदार ही अमित शहा यांच्या आश्वासनानंतरच फुटलेले आहेत. शिंदेच्या आश्वासन व भरवसावर स्व पक्षाशी गद्दारी करावी इतके शिंदे महाराष्ट्रातील राजकारणात आज ही मोठे नाहीत व उद्या ही मोठे असणार नाहीत. नेतृत्व करण्यासाठी औकात व आवाका लागतो तो शिंदेमध्ये कधीच नव्हता, सध्या नाही व पुढे ही कधी असणार नाही. मात्र मराठी माणसांची शक्ती व आवाज बनलेली शिवसेना संपविणे हा भाजपच्या शत प्रतिशत राजकारणाचा अजेंडा असून त्यासाठी शिंदेंची भाजपला गरज आहे. उद्धव सेनेच्या खासदार, आमदार व नगरसेवकांना फोडून मूळ शिवसेना संपविली जात आहे, असे शिंदेंना वाटत असले तरी भाजपला ते वाटत नाही. शहाने शिंदेचा शिवसेना प्रमुख म्हणून अलिकडे उल्लेख केला असला तरी राज्यातील जनतेसाठी आज ही उद्धव ठाकरे यांचीच शिवसेना खरी असून तिचे प्रमुख उद्धव ठाकरे हेच आहेत. शिवसेना तोडून ही मराठी माणसाच्या मनातील ही प्रतिमा मोदी, शहा तोडू शकले नाहीत. राज्यातील फडणवीस यांच्यासह एका ही भाजप नेत्यांची इतकी औकात नाही की, ते ही प्रतिमा तोडतील. ही प्रतिमा तुटत नाही व उद्धव ठाकरे मागे हटत नाहीत, तोपर्यंतच शिंदेचे गद्दारीचे राजकारण सुरू राहिल. 

           महाराष्ट्रातील भाजपचा राजकीय प्रवास हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रभावाखालीच फुलला व फळला आहे. शिंदे ज्यांच्या जीवावर राजकारण करीत आहेत, ते मोदी आणि शहा यांची उंची ते किती ही मोठे झाले तरी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची बरोबरी करू शकणार नाहीत. त्याशिवाय अगदी पडत्या काळात मोदी व शहा या दोघांना ही मातृश्रीने मदत व उपकार केले आहेत. ठाकरे परिवाराचे मीठ खाल्ले आहे. आज ते या मिठाला जागत नाहीत, हा भाग वेगळा असला तरी ते नमकहरामी करीत आहेत. हे सर्वांना माहित आहे. उद्धव ठाकरे ही त्याचे साक्षीदार आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात देवेंद्र फडणवीसचं काय मोदी व शहा ही सरळ मैदानात उतरले तरी ते पुरून उरतील. त्यासाठीच शिंदेसारख्या बांडगुळाच्या हाती सत्तेचा गैर वापर शिवसेना व चिन्ह दिले गेले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचे वलय व वोट बँक आज ही राज्यभरात आहे. त्यासाठी शिंदेंची भाजपला गरज आहे. ज्या दिवशी ही गरज संपेल तेव्हा शिंदे आणि त्यांच्या गटाचे हाल बाथरूमच्या बाहेरील गटारातील कंडोमसारखी होणार असून याची जाणीव शिंदे यांना ही आहे. 

         उद्धव ठाकरे अतिशय उत्तम नेते आहेत. त्यांच्यावर आमचे प्रेम आहे. मात्र मतदारसंघाच्या विकासासाठी आम्ही पक्षांतर करीत आहोत, असे उबाठाशी गद्दारी करून शिंदे गटात प्रवेश करणाऱ्या सहा खासदारांचे म्हणणे आहे. मात्र गद्दारी मतदारसंघाच्या विकासासाठी नव्हे तर स्वतःचा विकास व स्वार्थासाठी करण्यात आलेली आहे. गेल्या दोन वर्षात या सहा खासदारांना आपापल्या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी १४ ते २० कोटी रुपयांचा निधी मिळाला असून यापैकी एका ही खासदाराने त्यातील दहा टक्के ही निधी खर्च केलेला नाही. त्यामुळे मतदारसंघाचा विकास ही ओरडच चुकीची आहे. पण एक वेळ असे मानू की मतदारसंघाच्या विकासासाठी अधिकचा निधी मिळावा म्हणून या खासदारांनी स्व पक्षाशी व मतदारांशी गद्दारी करून पक्षांतर केले आहे, तर त्यांनी मुख्यमंत्री आणि अर्थखात्याचा पदभार असलेल्या फडणवीसांच्या पक्षात जायला हवे होते. ते शिंदे गटात का गेले ? अजित पवार अर्थमंत्री असताना शिंदे गटातील आमदार व खासदारांना निधी देत नव्हते, अशी ओरड एकनाथ शिंदे यांच्या सह त्यांच्या गटातील लोक प्रतिनिधींनी या अगोदर जाहीरपणे केलेली आहे. सध्या फडणवीसांकडे अर्थ खात्याचा पदभार आहे. ते ही निधी देत नाहीत. पण ओरड करण्याची ही हिंमत ना एकनाथ शिंदे यांच्यात आहे ना त्यांच्या गटातील आमदार व खासदारांमध्ये आहे. यावरून स्पष्ट होते की, मतदारसंघाचा विकास ही ओरड केवळ बहाणा असून स्वस्वार्थासाठी केलेली ही गद्दारी व पक्षांतर आहे.

            नरेंद्र मोदी यांचा फोटोवर व नावावर शिवसेनेचे खासदार निवडूण आल्याची ओरड भाजप २०१९ पासून करीत आहेत. हा एकदम खोटारडेपणा आहे. मोदींच्या अगोदर ही शिवसेनेचे खासदार निवडूण आलेले आहेत. तर २०२४ मध्ये मोदीच्या विरोधात उभे राहून ही उद्धव सेनेचे ९ खासदार निवडूण आले आहेत. पण खोटारडेपणावर भाजपचे अस्थित्व टिकून असल्याने ते अशाच बोंबा मारणार. मोदीच्या नावावर मत मिळतात, यावर भाजपचा विश्वास असेल तर महाराष्ट्रात एकदा प्रचारातून बाळासाहेब ठाकरे यांना वगळून दाखवावे म्हणजे भाजपला मोदीची खरी औकात कळेल. भाजपचे नेते आणि पदाधिकारी हे जन समर्थन असणारे नाहीत. त्यामुळे मोदींच्या लाचारीवरच त्यांचे राजकीय अस्तित्व टिकून आहे. त्यामुळे त्यांच्या पुढे असा खोटेपणा केल्याशिवाय कुठलाच पर्याय नाही.

एकनाथ शिंदेंनी गद्दारी केली नसती तर राज्यात भाजपची वाट लागली असती…..!

             महाराष्ट्रात भाजपचा एक ही खासदार नसताना, आमदारांची संख्या केवळ एका हाताच्या बोटावर मोजता येत असताना आणि कुठल्या ही महानगरपालिकेत, जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता नसताना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी भाजपसोबत युती केलेली आहे. ही युती तीन दशकांपेक्षा अधिक काळ शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात अभेद्द होती. पण शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वाद व मदतीने राष्ट्रीय राजकारणातील उच्च पद मिळताच मोदी व अमित शहा या दोघांनी ही शिवसेनेला संपविण्याचा प्रयत्न केलेला आहे. २०१४ ते २०१९ या पाच वर्षांच्या सत्ताकाळात शिवसेनेला अनेक वेळा अपमानित करण्याचा प्रयत्न भाजपने केला. राज्यात सेनेचे आमदार अधिक असताना मुख्यमंत्री सेनेचा झाला, पण उपमुख्यमंत्री भाजपचा केला गेला. पण युतीचा धर्म व सूत्र भाजपने आपले अधिक आमदार आल्यानंतर पाळले नाही. उलट सेनेला कमजोर कसे करता येईल, अशाच पद्धतीने राजकीय खेळ्या केल्या. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना उद्धव ठाकरे यांनी पहिली अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद मागितले होते. त्यासाठी भाजपचा होकार ही होता. विधानसभेवर शिवसेनेचा भगवा फडकावून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठीच जनतेकडे कौल मागितला गेला. पण अधिक आमदार येताच भाजपने अपेक्षेप्रमाणे पलटी मारून आपला खरा चेहरा दाखविला. त्यास ११५ आमदार निवडूण आणणाऱ्या भाजपाला सत्तेच्या बाहेर हाकलून उद्धव ठाकरेंनी ही तसाच जबाब दिला. शिंदेंनी गद्दारी केली नसती तर २०२४ मध्ये भाजपची राज्यात पूर्ण वाट लागली असती.

         मोदी, शहाकडे सत्ता आहे.ईडी व सीबीआय आहे. न्यायालये आणि न्यायाधीश आहेत. गोदी मिडिया आहे. त्यामुळे ऑपरेशन टायगर यशस्वी झाले. शिवसेनेची आणि ज्या शरद पवारांनी अनेक पक्ष फोडले त्यांचा पक्ष फोडण्यात ही भाजपला यश आले. अजित पवार पक्ष फोडून भाजपसोबत गेले नसते तर ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्यात अडकून जेलमध्ये गेले असते. एकनाथ शिंदेचे ही तसेच आहे. ते ही ईडी, सीबीआयच्या रडारवर आले होते. त्यामुळेच घाबरून त्यांनी गद्दारी केलेली आहे. आज विरोधी पक्षातील सर्व घाण एकतर भाजपमध्ये आहे अथवा भाजपसोबत आहे.

         ऑपरेशन टायगरनंतर उद्धव ठाकरे अधिक सक्रीय झाले असून त्यांनी गद्दार खासदारांच्या मतदारसंघात सभांचे आयोजन करून मतदारांची माफी मागण्याचा कार्यक्रम सुरू केला. मी या गद्दारांना उमेदवारी दिली. अन् त्यासाठी मीच मतं मागितली. आता त्यांनी माझ्याशी आणि आपल्याशी ही गद्दारी केली आहे. त्यापेक्षा मी अधिक दोषी असल्याने मला माफ करा. आपण पुन्हा लढू आणि जिंकू असे उद्धव ठाकरे या प्रत्येक सभेत बोलत असून या सभांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या प्रचंड गर्दीच्या सभांमुळे खरी आणि ओरिजनल शिवसेना ही उद्धव ठाकरेंचीच आहे. हे चित्र महाराष्ट्राने या सभांच्या माध्यमातून पाहिले आहे. या सभांमुळे गद्दार खासदारांच्याच्याच तोंडचे पाणी पळाले आहे, असे नव्हेतर भाजपच्या सत्तेला ही सुरुंग लावण्याचे काम या सभा करीत आहेत. सत्तेसाठी जनहिताची धोरणे न राबविता केवळ तोडफोड करून सत्ताचे राजकारण करणारी भाजप पुरोगामी महाराष्ट्रातील जनतेच्या डोक्यात बसली असून त्याचे परिणाम येणाऱ्या काळात त्यांना भोगावेच लागतील. 

राहुल गायकवाड,

महासचिव समाजवादी पार्टी 

मुंबई/महाराष्ट्र प्रदेश

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *