• 77
  • 1 minute read

संघ आणि मोदींच्या अहंकार व दडपशाहीला ही झुकवून तरुणाईने मिळविला राजीनामा…..!

संघ आणि मोदींच्या अहंकार व दडपशाहीला ही झुकवून तरुणाईने मिळविला राजीनामा…..!

दडपशाहीच्या विरोधात ZEN - G चा संघर्ष अब सडक से संसद तक....!

              देशाचे शिक्षण मंत्री म्हणून असलेली जबाबदारी नीट पार पाडली नाही, त्यामुळे नीट – युजी आणि अन्य साऱ्या स्पर्धा व नोकर भरतीमध्ये गेल्या दहा वर्षात मोठे घोटाळे झाले आहेत. पेपर फुटीमुळे नैराश्य आलेल्या १८ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. गेल्या दहा वर्षांत १५२ वेळा झालेल्या पेपर फुटी प्रकरणानंतर ही यातील आरोपींवर कठोर कारवाई केली नाही, या साऱ्यांची नैतिक जबाबदारी स्वीकारून मोदी सरकारने शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा स्वीकारला आहे, तो केवळ देशातील तरुणाईने संसद भवनावरच धडक देवून जाब विचारल्यामुळेच. मोदी सरकारच्या दडपशाहीपुढे अथवा डोकी आणि हात पाय तोडणाऱ्या पोलिसांच्या लाठ्या काठ्यांपुढे तरुणाई झुकली नाही, भाडोत्री व दो कवडीचे संघी गुंड व पोलिसांच्या मारहाणीत तीन तरुण आंदोलकांचा मृत्यू झाला, अनेक तरुण जखमी झाले. त्यामुळे संघाला झुकावे लागले. मोदी व त्यांच्या अहंकाराला झुकावे लागले, त्यामुळे हा राजीनामा घेतला गेला आहे. मोदी सत्तेच्या काळात झालेला हा असा पहिला राजीनामा असल्याने उलटी गिनती सुरू झाली आहे.

              सोनम वांगचूक यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर जंतरमंतरवरील आंदोलन संपेल, असे सरकारला वाटत होते. पण तसे काही घडले नाही. कॉक्रोच जनता पार्टी आणि सोनम वांगचूक यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू झाले असले तरी आंदोलनाची सूत्र या देशातील तरुणाईने आपल्या हातात घेतली आहेत. त्यामुळेच भाजप, संघ आणि सरकारी प्रवक्त्यांनी आंदोलन हायजॅक झाल्याचे म्हटलेले आहे. हे आंदोलन या देशातील तरुणाईच्या लढ्याचे श्रेय आहे. या आंदोलनाला सडक से संसद तक लढणाऱ्या काँग्रेस, समाजवादी, डाव्या पक्ष, संघटना आणि त्यांच्या नेत्यांचे श्रेय आहे. त्याशिवाय सर्व स्तरातून, जाती, धर्म व्यवस्थेच्या भिंती तोडून केवळ अहंकारी, हुकूमशाही मोदी सरकारच्या विरोधात उभा राहिलेल्या या देशाच्या नागरिकांच्या एकजुटीला याचे श्रेय जाते.
          पेपर लीक आणि शिक्षण व्यवस्थेतील सारे प्रश्न, समस्या सुटल्या आहेत, हे समजण्याचे ही काही ककारण नाही. ही लढाई आता कुठे सुरू झाली आहे. जंतरमंतरवर झालेली एकता कायम राहिली, तर देशातील सर्वच विद्यापीठात कुलगुरू म्हणून जे संघी गुंडे बसले आहेत, त्यांना ही आता रडारवर घेणे गरजेचे आहे. देशातील विज्ञानवादी शिक्षण व्यवस्थेला कर्मकांडात ढकलणाऱ्या संघी अजेंड्याच्या व सरकारच्या धोरणांच्या विरोधात ही आता असाच संघर्ष याच तरुणाईला लढावा लागणार आहे. याचा पुढचा टप्पा तोच असणार आहे. 
           साऱ्या बहुजन वर्गाला शिक्षण नाकारणाऱ्या शक्तींच्या हातात आज सत्ता असून त्या सत्तेचा वापर ते पाशवी पद्धतीने करीत आहेत. पेपर फुटी थांबवा, नैतिक जबाबदारी म्हणून शिक्षण मंत्रांनी राजीनामा द्यावा, ज्या विद्यार्थ्यांनी नैराश्येमुळे आत्महत्या केल्या आहेत, त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक सहाय्य करण्यात यावे, या मागण्या न्याय आहेत. हक्क आणि अधिकारांच्या चौकटीचा भाग आहेत. मात्र त्यासाठी आंदोलन करणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांना मोदी सरकारच्या पोलिसांचा आणि भाडोत्री गुंडांचा सामना करावा लागला आहे. काहीना आपले प्राण गमवावे लागले आहेत. या राजीनाम्यामुळे या सर्व गोष्टी संपुष्टात येतील, हा भ्रम चुकीचा ठरेल. त्यामुळे शिक्षण व्यवस्थेतील आमूलाग्र बदल आणि शिक्षण व्यवस्था जनताभिमुख करण्याच्या संदर्भातील आंदोलन या पुढील काळात लढले पाहिजे. तरच हे आंदोलन खऱ्या अर्थाने सफल ठरेल.
             सोनम वांगचूक, अभिजित दिपके यांच्यासोबत या आंदोलनात ऑल इंडिया स्टूडेंट असोसिएशन (AISA) ची भूमिका अतिशय महत्वाची राहिलेली आहे. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत AISA च्या राष्ट्रीय अध्यक्षा नेहा बोरा आणि त्यांच्या साथीदारांनी दडपशाहीच्या परिस्थितीत ही आंदोलनाला योग्य दिशा दिली, भरकटू दिले नाही. प्रत्यक्ष आंदोलनातील AISA ची भूमिका अतिशय महत्वाची राहिलेली असून या राजीनाम्याचे खऱ्या अर्थाने हक्कदार तेच आहेत. त्याशिवाय सोनम वांगचूक यांच्यासोबतच AISA च्या नेहा बोरा, मनिष कुमार आणि अमीन यांनी ही २३ दिवस आमरण उपोषण ही केलेले आहे. त्यामुळे तेच या आंदोलनाचे आयकॉन ठरले आहेत.
.
 
राहुल गायकवाड,
महासचिव , समाजवादी पार्टी,
मुंबई/महाराष्ट्र प्रदेश
1Shares

Related post

अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात राहुल गांधींनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली

अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात राहुल गांधींनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली

काँग्रेस नेते राहुल गांधी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात नवी दिल्ली, १३ ऑगस्ट:…
मत्स्यविज्ञानात विद्यार्थ्यांना करियरच्या उत्कृष्ट संधी !!

मत्स्यविज्ञानात विद्यार्थ्यांना करियरच्या उत्कृष्ट संधी !!

१२वी विज्ञान उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधीः संशोधन, उद्योग आणि ऊद्योजकतेचे खुले दालन प्रवीण बागडे  नागपूर  मो.क्र. ९९२३६२०९१९…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *