• 11
  • 1 minute read

५० वर्षांनंतर : जननायक करप्युरी ठाकूर यांच्या वारसदाराचा ही संघोट्यांकडून अवमान व अपमान…!

५० वर्षांनंतर : जननायक करप्युरी ठाकूर यांच्या वारसदाराचा ही संघोट्यांकडून अवमान व अपमान…!

५० वर्षांनंतर : जननायक करप्युरी ठाकूर यांच्या वारसदाराचा ही संघोट्यांकडून अवमान व अपमान...!

नितीशकुमार यांच्या अवमान व अपमानाची शृंखला जेडीयूच्या तीन तेरा वाजवूनच थांबेल….!
 
सन १९७८ साली जननायक करप्युरी ठाकूर यांच्यावर जातीवाचक टिप्पणी आणि आईवरून शिव्या देणाऱ्या जनसंघाच्या औलादी भाजपने पुन्हा जननायकाचे वारसदार नितीशकुमार यांना अपमानित केले. ९ ते १० टर्म बिहारचे मुख्यमंत्रीपद भूषविलेल्या नितीशकुमार यांना पहिल्यांदा अपमानित करून मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यायला लावला व आज मंत्रिमंडळ विस्ताराच्या वेळी योग्य तो सन्मान दिला नाही. भले ही चिटिंग करून का होईना, पण बिहारचे मुख्यमंत्रीपद भाजपला नितीशकुमार यांच्याच मुळे मिळाले आहे. त्यामुळे आजच्या सोहळ्याचे खरे तर तेच हक्कदार होते. पण अतिशय लाचार करून मोदींनी त्यांना मंचावर बोलविले. लाचारीचे भाव नितीशकुमार यांच्या चेहऱ्यावर, तर अहंकार मोदीच्या चेहऱ्यावर दिसत होता. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यायला सांगताना मुलाला उपमुख्यमंत्रिपद देण्याचा सौदा झाला होता, पण त्यास ही मोदीने फाट्यावर मारून नुसते मंत्री केले. हा डब्बल अपमान व अवमान असून सत्तेच्या लालसेने नितीशकुमार यांच्यावर अपमानित होण्याची वेळ आणली आहे. या अवमान, अपमानाची शृंखला इथेच थांबणार नाहीतर नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील जनता दल युनायटेडच्या तीन तेरा वाजवून थांबणार आहे. तो दिवस ही नितीशकुमार यांना असेच लाचार होऊन पाहवा लागणार आहे.
         
 २०१४ ते २०१९ आणि २०१९ ते २०२४ या दोन टर्मने मोदी संविधान व लोकशाही विरोधी असल्याचे सिद्ध झाले होते. मोदी देश तोडीत आहेत, मोदी देश विकत आहेत, मोदी जनविरोधी आहे. हे ही स्पष्ट झाले होते. त्यामुळे देशातील जनता मोदीच्या हातात तिसऱ्यांदा देशाच्या सत्तेची सूत्रे द्यायला तयार नव्हती. पण मोदी तिसऱ्यांदा काटावरच्या बहुमताच्या जोरावर तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले, ते केवळ नितीशकुमार यांच्यामुळे. भविष्यात मिळणाऱ्या पदाच्या लालसेने नितीशकुमार यांचा घात केला व ते इंडिया आघाडीतून बाहेर पडले. लोकसभा निवडणुकीच्या वेळी नितीशकुमार इंडिया आघाडीसोबत उभे राहिले असते, तर एकट्या बिहारमधून भाजप व मित्र पक्षाच्या किमान २० जागा कमी झाल्या असत्या. म्हणजे भाजप २२० जागांवरच अडकला असता. बहुमताचा २७२ चा आकडा पार करणे मोदीला कुठल्याही परिस्थितीत शक्य झाले नसते. केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार आले असते. नितीशकुमार पंतप्रधान अथवा उप पंतप्रधान आणि बिहारमध्ये आज जेडीयूचा मुख्यमंत्री असता. नितीशकुमार यांना अपमानित होऊन सत्तेतून बेदखल व्हावे लागले नसते.
       
बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा नितीशकुमार हेच होते. भाजपकडे चेहरा नव्हता. आज मुख्यमंत्री झालेले सम्राट चौधरी चेहरा असते, तर भाजपला निवडणूक आयोग व EVM मशीन ही वाचवू शकली नसती. त्याशिवाय नितीशकुमार एनडीएत नसते, तर भाजपला लोकसभेत ज्या १२ जागा मिळाल्या आहेत, त्यातील एखाद दुसरी जागा मिळाली असती. जतीनराम मांझी, चिराग पासवान ही सोबत नसते. त्यामुळे किमान १८ ते २० जागा कमी झाल्या असत्या. मोदी आज पंतप्रधान आहेत त्याचे सारे श्रेय निवडणूक आयोग, EVM मशीन आणि नितीशकुमार यांचे आहे. त्याशिवाय बिहारचे मुख्यमंत्रीपद ही भाजपला मिळाले नसते. थोडक्यात केंद्रात आणि राज्यात ही केवळ नितीशकुमार यांच्यामुळे मोदी व भाजप आहे. तर मोदींमुळे नितीशकुमार सत्तेच्या परिघातून बेदखल होऊन लाचार झाले आहेत.
        
  उद्धव ठाकरे व अखिलेश यादव यांच्यासारखे कुशल नेतृत्व राहुल गांधी व ममता बॅनर्जी यांच्यामध्ये असते तर……!
 
          महाराष्ट्रात शिवसेना उबाठाचे उद्धव ठाकरे आणि उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या कुशल नेतृत्वामुळे या दोन्ही प्रदेशात भाजपचा दारूण पराभव झालेला आहे. महाराष्ट्रातील ४८ जागांपैकी ३१ जागा इंडिया आघाडीने जिंकल्या, तर उत्तर प्रदेशातील ८० पैकी निम्म्या जागा ही अखिलेश यादव यांनी मिळू दिल्या नाहीत. या दोन्ही राज्यात मिळून किमान ४० ते ४५ जागांचे नुकसान भाजपला झालेले आहे. असाच यशस्वी प्रयोग ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये केला असता. काँग्रेस आणि डाव्या पक्षांना सन्मानाने सोबत घेतले असते तर भाजपचा इथे ही ३ ते ४ जागांवर रोखता आले असते व इंडिया आघाडीच्या पारड्यात ८ ते ९ जागा वाढल्या असत्या. तर तेलंगणामध्ये आणि डाव्या पक्षांना, कर्नाटकमध्ये जनता दल सेक्युलरला काँग्रेसने सन्मानाने सोबत घेतले असते तर तेलंगणांमध्ये ४ ते ५ आणि कर्नाटकमध्ये १० जागा भाजपच्या कमी झाल्या असत्या. महाराष्ट्र व उत्तर प्रदेश सारखा पर्याय मोदीसमोर उभा करण्याची गरज असताना पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी व कर्नाटक, तेलंगणामध्ये राहुल गांधी यांच्या अकुशल नेतृत्वाने भाजपला किमान २५ जागांचा फायदा करून दिला आहे. नितीशकुमार यांच्या प्रमाणेच मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनविण्यामध्ये ममता बॅनर्जी व राहुल गांधी यांच्या अकुशल नेतृत्वाचा फार मोठा वाटा आहे.
        महाराष्ट्रात उद्धव ठाकरे व उत्तर प्रदेशातील उद्धव ठाकरे व अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाने मोदी व भाजपला धूळ चारली, तशीच धूळ पश्चिम बंगाल, कर्नाटक व तेलंगणमधील चारता आली असती. अन् असे घडले असते तर तृणमूल काँग्रेसची जी अवस्था आता विधानसभा निवडणुकीत झालेली आहे, तशी अवस्था झाली नसती. इंडिया आघाडीतील सर्वात मोठा पक्ष म्हणून आघाडीला अधिक भक्कम व मोदीसमोर पर्याय म्हणून उभे करण्याची नैतिक जबाबदारी राहुल गांधी व ममता बॅनर्जी यांची होती. पण या दोघांनी ही पक्षाचा विचार केला. देशाचा केला नाही. त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागत आहेत. दिल्ली आणि पंजाबमध्ये आम आदमी पार्टीची सत्ता आणि वर्चस्व होते. या ठिकाणी ही मोदीला पर्याय देऊन एकास एक उमेदवार देण्यात इंडिया आघाडीला केजरीवाल यांच्या भूमिकेमुळे यश आले नाही. त्याचे दुष्परिणाम आज आपला भोगावे लागत आहेत. राज्यसभेच्या १० सदस्यांपैकी ७ सदस्य आप सोडून भाजपमध्ये सामिल झाले आहेत. मोदीला तिसऱ्यांदा सत्तेवर येऊं द्यायचे नाही, हा अजेंडा घेऊन इंडिया आघाडी देशभर निवडणूक मैदानात उतरली असती. काही ही करून नितीशकुमारला सोबत ठेवले असते, एकास एक उमेदवार मैदानात उतरविले असते, तर भाजप व मित्र पक्षांना दोनशेच्या आत सहज गुंडळता आले असते. अन् २७२ च्या बहुमताच्या आकड्यापासून मोदी कोसो मैल दूर असते.
        इंडिया आघाडी भक्कमपणे लढली असती तर मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले नसते. पण विरोधकांमधील आपापसातील समन्वय व सत्तेच्या लालसेने असे काही घडले नाही. तिसऱ्यांदा मोदीची सत्ता आली नसती, तर महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत ७० लाख अतिरिक्त मतदान झाले नसते व भाजपाची सत्ता आली नसती. हरियाणा व बिहारमध्ये ही भाजपची सत्ता आली नसती. ओरिसा व पश्चिम बंगालमध्ये ही सरकार स्थापन करण्याच्या स्थितीत भाजप पोहचला नसता. सत्तेसाठी वाट्टेल ते करण्याचा अजेंडा मोदींचा आहे. तर विरोधकांमध्ये समन्वय व इच्छाशक्तीचा अभाव आहे. याचाच फायदा मोदी व भाजपला मिळत असून विजयी घोडदौड सुरू आहे.
       
  राहुल गांधी व ममता बॅनर्जी आपशी समन्वयाच्या अभावाचे बळी…..!
 
                निवडणूक आयोग, SIR, ईडी, सीबीआय, मत विभाजन करणारे पक्ष, EVM मशीन या साऱ्या गोष्टींचा गैर वापर करून मोदी निवडणुका जिंकत आहे. याबाबतचे भक्कम पुरावे विरोधकांकडे आहेत. पण दाद मागणार कुठे ? हा प्रश्न आता विरोधी पक्षांना पडला आहे.. तसेच सदोष निवडणूक प्रक्रिया, EVM, आयोग, भारतीय दलाल गोदी मिडिया आणि सर्वोच्च न्यायालय ही मोदीने खरेदी केल्याने विरोधकांकडे किती ही पुरावे असले तरी त्यांना न्याय मिळत नाही. अशी परिस्थिती आज देशभर असून यावर मात कशी करायची याचा गंभीर विचार व चिंता करण्याची गरज आहे. भारतीय जनता आणि मतदार खऱ्या अर्थाने विरोधी पक्षांसोबत आहे. तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय जनता दलाला मिळालेली मतं आणि आज तृणमूल काँग्रेसला मिळालेल्या मतांवर स्पष्ट होत आहे. भाजपच्या सीट वाढत आहेत. मात्र मत एक दोन टक्क्याचा फरक सोडला तर मतदान सारखेच आहे. यामध्ये विरोधकांना मिळालेली मतं ही खऱ्या अर्थाने मिळालेली आहेत. तर भाजप व मोदीला मिळत असलेली मत ही चोरीची आहेत.
         ज्या ज्या निवडणुका मोदीने जिंकल्या आहेत, त्या साऱ्या ईडी, सीबीआय, चुनाव आयोग, प्रशासकीय यंत्रणा आदींचा गैर वापर करून जिंकल्या आहेत. पण इतके करून ही मोदीला या निवडणुका जिंकता आल्या नसत्या. हे ही तितकेच खरे आहे. या सर्व यंत्रणांच्या गैर वापरसोबतच मतं विभाजनाचा फॉर्म्युला ही मोदींच्या या विजयासाठी महत्त्वपूर्ण ठरला आहे. आंबेडकरी विचारांच्या पक्षांना व एमआयएमला ही आर्थिक बळ देवून मोदींनी मतं विभाजनासाठी निवडणुकांच्या मैदानात उतरविले. इतकेच नव्हे तर इंडिया आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या काँग्रेस व तृणमूल काँग्रेसमधील समन्वयाचा असलेला अभाव ही मोदीला निवडणुका जिंकून देण्यास कारणीभूत ठरला आहे. इंडिया आघाडीची स्थापना झाल्यानंतर मोदीसमोर खऱ्या अर्थाने पर्याय उभा राहिला होता. मात्र पुढील काळात या आघाडीतील नेत्यांमध्ये समन्वय राहिला नाही. याचा फायदा ही मोदीने घेतला व विजयी घोडदौड सुरू ठेवली. राहुल गांधी व ममता बॅनर्जी समन्वयाच्या अभावाचे बळी असून त्याची किंमत देश मोजत आहे.
 
राहुल गायकवाड
0Shares

Related post

नॅशनल स्टॉक एक्सचेंजची (NSE एन एस इ) आकडेवारी:  भारतीय अर्थव्यवस्थेच्या वित्तीयकरणाचा सांगावा !

नॅशनल स्टॉक एक्सचेंजची (NSE एन एस इ) आकडेवारी: भारतीय अर्थव्यवस्थेच्या वित्तीयकरणाचा सांगावा !

नॅशनल स्टॉक एक्सचेंजची (NSE एन एस इ) आकडेवारी: भारतीय अर्थव्यवस्थेच्या वित्तीयकरणाचा सांगावा ! एप्रिल २०२६ पर्यंत…

यादवों को ही धार्मिक षडयंत्र का शिकार क्यों बनाया जाता है?

आजकल हिन्दू धर्म के छ: हजार जातियों में सिर्फ यादव जाति को ही महिमा मंडित करते…
स्टालिनने सत्ता गमावली असेल, पण त्यांनी आपली राजकीय प्रतिष्ठा गमावलेली नाही.

स्टालिनने सत्ता गमावली असेल, पण त्यांनी आपली राजकीय प्रतिष्ठा गमावलेली नाही.

स्टालिनने सत्ता गमावली असेल, पण त्यांनी आपली राजकीय प्रतिष्ठा गमावलेली नाही. तामिळनाडूमध्ये डीएमकेच्या पराभवामागे कोणतीही कारणे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *