• 139
  • 1 minute read

डॉ बाबासेहब आंबेडकर एखाद्या जातीचे आयकॉन बनवणे हा डॉ बाबासाहेबांनी ज्यांचा प्रस्थापितपणा उध्वस्त केला त्यांचा राजकीय अजेंडा आहे ;

डॉ बाबासेहब आंबेडकर एखाद्या जातीचे आयकॉन बनवणे हा डॉ बाबासाहेबांनी ज्यांचा प्रस्थापितपणा उध्वस्त केला त्यांचा राजकीय अजेंडा आहे ;

डॉ बाबासेहब आंबेडकर एखाद्या जातीचे आयकॉन बनवणे हा डॉ बाबासाहेबांनी ज्यांचा प्रस्थापितपणा उध्वस्त केला त्यांचा राजकीय अजेंडा आहे

डॉ बाबासेहब आंबेडकर एखाद्या जातीचे आयकॉन बनवणे हा डॉ बाबासाहेबांनी ज्यांचा प्रस्थापितपणा उध्वस्त केला त्यांचा राजकीय अजेंडा आहे ;  त्या राजकीय अजेंड्याला कॉउंटर करायचे तर डॉ बाबासाहेबांचे वैश्विक (भारतातच नाही तर भारताबाहेर ) आणि सार्वकालिक (पुढच्या अनेक पिढ्यांसाठी कसे उपयुक्त आहे ) अपील काय आहे यावर सतत मांडणी केली गेली पाहिजे. 
ही मांडणी करताना डॉ आंबेडकरांनी जी मानवमुक्तीची, जातीव्यवस्था निर्मूलनाची, जनकेंद्री आर्थिक विचारांची मांडणी केली ती देखील वैश्विक मूल्यांवर आधारितच आहे हे नमूद करूया. (पोस्ट मर्यादित ठेवण्यासाठी येथे फक्त एवढेच) काय आहे डॉ बाबासाहेबांचे वैश्विक आणि सार्वकालिक अपील ? (आणि हि यादी अर्थातच परिपूर्ण नाही)
कोणताही शैक्षणिक वारसा मिळालला नसतांना , त्या त्या काळातीलच नव्हे तर सार्वकालिक अत्युच्च शैक्षणिक पात्रता कमवता येते हे दाखवून दिले सामाजिक / राजकीय शत्रूच्या वैचारिक अंगणात जाऊन शत्रूंच्या भाषेत , इंग्रजी भाषेत त्यांच्या वैचारिक / सांस्कृतिक वारशांची चिरफाड केली 
समाज परिवर्तनासाठी नुसते ग्रंथ वाचन आणि ग्रंथ लेखन पुरते मर्यादित न ठेवता त्याला जन आंदोलनाची / लोकांना संघटित देखील केले पाहिजे हे कृतीने दाखवून दिले 
 
“भाकरी आधी कि आत्मसम्मान”च्या बुद्धिभेदी प्रश्नाला “दोन्ही एकाचवेळी”चे निस्संदिग्ध उत्तर दिले 
आपण ज्यांच्या उद्धारासाठी काम करतो त्यांच्या गरिबी / दारिद्र्याचे ओझे न बाळगता सुटात बुटात टेचात राहिले  सगळे काही करतांना आपल्या किमान राहणीमानासाठी आवश्यक ते पैसे कमावले 
ठरवलेच असते तर तत्कालीन एलिट क्लास मध्ये एंट्री पास मिळू शकत असतांना त्या क्लब मध्ये सामील होण्यास नकार दिला 
 
तुम्ही किती पुस्तके वाचून स्वतःच किती संपृक्त झालात हे महत्वाचे नसते , आपल्या आणि पुढच्या पिढयांना शहाणे करण्यासाठी काय केलेत हे महत्वाचे असते हे कृतीने सांगितले  आयुष्यभर काँग्रेस पेक्षा वेगळी मांडणी, वेगळे राजकारण केल्यानंतर , स्वातंत्र्यनंतर बदललेल्या राजकीय संदर्भात अतिशय प्रगल्भपणे देशाच्या सामुदायिक नेतृत्वात सामील झाले  आणि उराशी बाळगलेल्या स्वप्नांसाठी , ध्येयासाठी अक्षरशः दिवसाचे २४ तास शरीर , मन , बुद्धी झिजवायची असते हे शिकवले   डॉ बाबासाहेबांचे हे अपील सर्व जाती / धर्मापलीकडचे आहे , ते भारतापुरते मर्यादित नाहीये आणि भविष्यात येणाऱ्या अनेकानेक पिढयांना ऊर्जा देत राहणारे आहे  
 
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना लक्ष लक्ष प्रणाम !
 
संजीव चांदोरकर 
 
 
 
0Shares

Related post

……ती रात्र जेव्हा एकटा शूद्र, संपूर्ण सिस्टमवर मात करून जिंकला !

……ती रात्र जेव्हा एकटा शूद्र, संपूर्ण सिस्टमवर मात करून जिंकला !

……..ती रात्र जेव्हा एकटा शूद्र, संपूर्ण सिस्टमवर मात करून जिंकला !          …
सीवूड्स येथील लुम्बिनी बुद्ध विहारात मुलांचा ‘विशेष वर्षावास कार्यक्रम’ उत्साहात संपन्न

सीवूड्स येथील लुम्बिनी बुद्ध विहारात मुलांचा ‘विशेष वर्षावास कार्यक्रम’ उत्साहात संपन्न

सीवूड्स येथील लुम्बिनी बुद्ध विहारात मुलांचा ‘विशेष वर्षावास कार्यक्रम’ उत्साहात संपन्न नवी मुंबई, दि. ७ (प्रतिनिधी):बौद्धजन…
४९० आदिवासी वसतिगृहातील आदिवासी विद्यार्थ्याना संघ – भाजपचे फुट सोल्जर्स बनविण्याचे कारस्थान ….

४९० आदिवासी वसतिगृहातील आदिवासी विद्यार्थ्याना संघ – भाजपचे फुट सोल्जर्स बनविण्याचे कारस्थान ….

विद्यार्थ्यांना संघी (ब्राह्मणी हिंदू ) बनविण्यासाठीच मानकर ट्रस्टचा महाराष्ट्रातील आदिवासी वसतिगृहात उपक्रम – डॉ. संजय दाभाडे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *