• 237
  • 1 minute read

काॅंग्रेसची डबल पाॅलिसी

काॅंग्रेसची डबल पाॅलिसी

काँग्रेस ही त्यांच्यातील दलित नेत्यांना कशी वागणुक देते ह्याचे ज्वलंत उदाहरण आहे ते माननीय किशोर गजभिये ह्यांचे. एक माजी आयएएस असलेले किशोर गजभिये ज्यांना 2019 लोकसभा निवडणुकीत रामटेक मधून 3.5+ लाख वोट मिळाले, ज्यांचे 2024 मध्ये निवडून येणे हे पक्के होते, त्यांना काँग्रेस च्या ब्राम्हणी नेतृत्वाने अपमानित करून लोकसभेची तिकीट नाकारली. त्यांच्या ऐवजी काँग्रेस ने अशा एका अनुसूचित जातीच्या माणसाला तिकीट दिली आणि निवडून आणले, जो पुढचे पाच वर्ष लोकसभेत तोंड सुद्धा उघडणार नाही.

ह्या किशोर गजभिये ह्यांच्या उदाहरणावरून काँग्रेस मध्ये दलित नेत्यांची काय किंमत आहे हे दिसून येते. एवढे सगळे स्पष्ट असतानाही बरेचसे हौसे गौसे दलित काँग्रेस मध्ये आपले राजकीय करीअर बनवण्याचे स्वप्न पाहत आहेत. एका दलित समाजाच्या हुशार माजी सनदी अधिकाऱ्याला जर काँग्रेस अशी अपमानास्पद वागणूक देत असेल तर इतर हौसे गौसे दलितांचे काँग्रेस मध्ये काय हाल होतील हे आपल्यासारख्या सुजाण लोकांना सांगणे न लगे !

किशोर गजभिये सरांची भेट झाली होती 2001 साली, ते नाशिक चे कलेक्टर असताना. मी तेव्हा स्टेट बँक ऑफ इंडिया, इंडस्ट्रिअल फायनान्स ब्रांच सातपूर, नाशिक येथे Probationary Officer म्हणुन पोस्टेड होतो. त्याच दरम्यान मी UPSC सिव्हिल सर्व्हिसेस ची प्रिलिम्स पास झालोय. मला Mains च्या तयारीसाठी गजभिये साहेबांना भेटून त्यांचे मार्गदर्शन पाहिजे होते. कलेक्टर ऑफिस ला डायरेक्ट फोन केला आणि सांगितलं साहेबांशी बोलायचं आहे. साहेब बोलले आजच संध्याकाळी भेटायला ये. मग साहेबांच्या घरी चहा घेऊन, त्यांच्यासोबत Evening walk करत करत एक तास त्यांचे मार्गदर्शन घेतले. त्याच वेळेस त्यांनी त्यांचा राजकारणातील इंटरेस्ट व्यक्त केला होता आणि स्वतःच बोलले होते की आपल्यासाठी बसप हाच योग्य पक्ष आहे. आणि वेळ आली तेव्हा त्यांनी सर्वप्रथम बसप च जॉईन केला. नंतर जे झाले ते सर्वज्ञात आहे. असो.

0Shares

Related post

इंडिया आघाडीचे नेतृत्व राहुल गांधी ऐवजी अखिलेश यादव अथवा एम. के स्टॅलिन यांच्याकडे असायला हवे…..!

इंडिया आघाडीचे नेतृत्व राहुल गांधी ऐवजी अखिलेश यादव अथवा एम. के स्टॅलिन यांच्याकडे असायला हवे…..!

विरोधकांच्या आघाडीने भक्कम पर्याय उभा केला नाही तर मोदी २०२९ मध्ये ही सत्तेत      …
नॅशनल स्टॉक एक्सचेंजची (NSE एन एस इ) आकडेवारी:  भारतीय अर्थव्यवस्थेच्या वित्तीयकरणाचा सांगावा !

नॅशनल स्टॉक एक्सचेंजची (NSE एन एस इ) आकडेवारी: भारतीय अर्थव्यवस्थेच्या वित्तीयकरणाचा सांगावा !

नॅशनल स्टॉक एक्सचेंजची (NSE एन एस इ) आकडेवारी: भारतीय अर्थव्यवस्थेच्या वित्तीयकरणाचा सांगावा ! एप्रिल २०२६ पर्यंत…

यादवों को ही धार्मिक षडयंत्र का शिकार क्यों बनाया जाता है?

आजकल हिन्दू धर्म के छ: हजार जातियों में सिर्फ यादव जाति को ही महिमा मंडित करते…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *