बा भीमा..

बा भीमा..

मुर्दाड होतो,
जाग आली जिवंत झालो.
“झुकलेली मान
ताठ झाली.
सन्मानाने जगू लागलो.
अडाणी होतो,
शिक्षित झालो.
“प्रश्न हक्क
अधिकार मागू लागलो.
मुके होतो,
बोलायला लागलो.
-हक्काचं लढा
लढू लागलो.
“गुलामीच जगणं
नाकारत
आम्ही स्वातंत्र्याकडे
निघालो.

बैलगाडीला
विटाळ असलेली
आम्ही माणस,
स्वतःच्या
मोटारीने
अन,
तिकिटे काढून
विमानाने फिरू लागलो.

चांगलं खाऊ लागलो
चांगलं राहू लागलो.
झोपडीतून
चांगल्या घरात राहू लागलो.

देशहितासाठी आम्ही
घरातून बाहेर येऊन
लढा बुलंद करू लागलो.
देशहित विरोधी
धोरणाबद्दल सिंहासारखे
गरजू लागलो.

आता जगणं
सुंदर झालं.
“आयुष्य बहरून 
आलं आहे.
आम्ही फार
सुखात आहोत.

हे सगळं
बा भीमा तुमच्यामुळे
शक्य झालं आहे.
तुम्ही नसता तर
अशी,
कल्पना जरी गेली
तरी पोटात गोळा
उठून पायाखालची
जमीन सरकुन जाते.

बा भीमा..
थँक्स हे जगणं सुंदर
करण्यासाठी…

0Shares

Related post

माथे पर लगा कलंक छिपाने की नहीं मिटाने की जरूरत है – शूद्र शिवशंकर सिंह यादव

माथे पर लगा कलंक छिपाने की नहीं मिटाने की जरूरत है – शूद्र शिवशंकर सिंह यादव

मूलनिवासी मिशन से भी उम्मीद नहीं की जा सकती !  आज शूद्र मिशन के पक्ष में…
कवी डॉ दिलीप लोखंडे कबिराकार यांना सेवापूर्ती निमित्त निरोप

कवी डॉ दिलीप लोखंडे कबिराकार यांना सेवापूर्ती निमित्त निरोप

कवी डॉ दिलीप लोखंडे कबिराकार यांना सेवापूर्ती निमित्त निरोप धुळे –जिल्हा परिषद धुळे येथील पशुसंवर्धन विभागाच्या…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *