• 193
  • 1 minute read

न्यायाची ऐशी की तैशी!

न्यायाची ऐशी की तैशी!

पुणे पोलीस आयुक्त कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीचे ठिय्या आंदोलन!

पुणे : न्यायाची ऐशी की तैशी असे म्हणत वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजलीताई आंबेडकर यांनी पुणे पोलिस प्रशासनाच्या भूमिकेवर थेट प्रहार केला. कोथरुड पोलिसांनी तीन सामाजिक कार्यकर्त्यांवर केलेल्या छळाच्या विरोधात अत्याचारित तीन महिला, अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते १ ऑगस्टपासून सकाळी १०.३० वाजल्यापासून पोलिस आयुक्त (CP) कार्यालयासमोर ठाण मांडून बसले आहेत.
त्यांनी एक्स वर पोस्ट करत आपली भूमिका मांडली आहे. 
रात्री ११.१५ वाजता पोलिसांकडून अजून एका तासाने FIR घेतो, नाहीतर FIR घेणार नाही असे लिहून देतो असे सांगण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे महिलांनी आणि कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला आहे.
 
प्रशासनाच्या या वागणुकीवर तीव्र नाराजी व्यक्त करत आंदोलकांनी CP कार्यालयातच मुक्काम ठोकला आहे. या संघर्षातून न्याय मिळवण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला असून, पुणे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तीव्र टीका होऊ लागली आहे.
 
 
 
0Shares

Related post

अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात राहुल गांधींनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली

अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात राहुल गांधींनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली

काँग्रेस नेते राहुल गांधी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात नवी दिल्ली, १३ ऑगस्ट:…
मत्स्यविज्ञानात विद्यार्थ्यांना करियरच्या उत्कृष्ट संधी !!

मत्स्यविज्ञानात विद्यार्थ्यांना करियरच्या उत्कृष्ट संधी !!

१२वी विज्ञान उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधीः संशोधन, उद्योग आणि ऊद्योजकतेचे खुले दालन प्रवीण बागडे  नागपूर  मो.क्र. ९९२३६२०९१९…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *