इंग्रजांच्या विरोधात लढून मृत्यू पत्करलेला टीपू सुलतान एकमेव प्रिन्स

इंग्रजांच्या विरोधात लढून मृत्यू पत्करलेला टीपू सुलतान एकमेव प्रिन्स

इंग्रजांच्या विरोधात लढून मृत्यू पत्करलेला टीपू सुलतान एकमेव प्रिन्स !

     टिपू सुलतान यांच्या बद्दलचे अभ्यासुन व्यक्त केलेले भाजपाचे संस्थापक सदस्य आणि उपाध्यक्ष राहिलेले जेष्ठ विचारक श्री के. आर. श्री मलकानी यांचे मत जाणून घेतले पाहिजे असे आहे.

‘ब्रिटीशांविरुद्ध लढताना मरण पावलेला टिपू सुलतान हा एकमेव राजा होता… (त्याच्या मृत्यूनंतर) भारतीय स्वातंत्र्य दीड शतकासाठी मावळले.’ हे उद्गार कर्नाटकच्या नवीन सरकारचे नसून भाजपच्या एका संस्थापक सदस्याचे आहेत.

भाजपचे संस्थापक सदस्य आणि प्रख्यात RSS पत्रकार के. आर. मलकानी (केवलराम रतनमाल मलकानी) यांनी दशकांपूर्वी लिहिले होते: ‘मी टिपू सुलतानबद्दल जितके जास्त वाचतो, तितके त्याच्या समृद्ध व्यक्तिमत्त्वाने मी प्रभावित होतो.’ टिपूची ही मनःपूर्वक प्रशंसा त्यांच्या ‘India First’ (ओशन बुक्स २००२) या पुस्तकाच्या पृष्ठ 204-207 वर आढळते. 

के. आर. मलकानी १९९१-९४ दरम्यान भाजपचे उपाध्यक्ष होते. त्यांनी ३५ वर्षे इतक्या प्रदीर्घ काळापर्यंत त्यांनी RSS चे साप्ताहिक ‘Organiser’ आणि हिंदी मुखपत्र ‘Panchjanya’ चे संपादक म्हणून काम केले. 

पक्षनेत्यांच्या विनंतीवरून संजय खान यांच्या ‘The Sword of Tipu Sultan’ (दूरदर्शन १९९०) या मालिकेची चौकशी करताना मलकानी यांनी टिपूची प्रशंसा केली होती. त्यांनी या विषयाचा सखोल अभ्यास केला आणि टिपूवरील सर्व ऐतिहासिक नोंदी वाचल्या.

मलकानींचे शेवटचे शब्द: ‘टिपूने ब्रिटीशांसमोर गुडघे टेकले असते तर तो एक राजा म्हणून जिवंत राहू शकला असता… पण टिपूने अपमानास्पद जगण्यापेक्षा मृत्यूला जवळ केले.’

के. आर. मल्कानी

      विशेष म्हणजे श्री मलकानी यांनी लिहिलेले India First हे पुस्तक त्यांनी 90 च्या दशकात दूरदर्शनवर प्रसारित होत असलेल्या ‘दि स्वॉर्ड ऑफ़ टिपू सुलतान’ या मालिकेवर वादंग उठले त्यावेळी त्या प्रकरणाचा मुळातून अभ्यास करताना श्री. मलकानी यांना जे निदर्शनास आले त्याबाबत त्यांनी त्यांच्या India First या पुस्तकात टिपू सुलतान यांच्यावर लिहिलेल्या प्रकरणात वरील माहिती लिहिलेली आहे.

     “टिपू सुलतानला इंग्रजांसोबतच्या युद्धात मरण आल्याने भारतीय स्वातंत्र्य दिडशे वर्ष पुढे फ़ेकल्या गेले असेही श्री मलकानी त्यांच्या या पुस्तकात म्हणतात. इतकेच नाहीतर ‘मी जितके खोलवर टिपू सुलतान यांच्या बद्दल वाचत गेलो तितका प्रभावित होत गेलो’ तत्कालीन परिस्थितीत इंग्रजांच्या विरोधात लढून मृत्यू पत्करलेला टिपू सुलतान एकमेव प्रिन्स आहे, आणि वैशविक दृष्टी असलेला एकमेव राजा होता. आणि म्हणून मी म्हणतो की अकबर, दारा शिकोह आणि टिपू सुलतान हे नायक ठरतात खलनायक नाही’ असे श्री मलकानी त्यांनी लिहिलेल्या या पुस्तकातील प्रकरणात म्हणतात.

    बरे हे लिहिणारे श्री मलकानी काही साधारण व्यक्तित्व नव्हते. काहीही न वाचता लिहिणारे नव्हते. उलटपक्षी संजय खान यांच्या मालिकेवरून सखोल अभ्यास करत करत त्यांनी ही मते लिहिलेली आहेत. नामांकित पत्रकार आणि विचारक राहिलेले होते. श्री. मलकानी सन 1994-2000 दरम्यान राज्यसभेचे खासदार होते. पॉंडेचरी या केंद्र शाशित प्रदेशाचे राज्यपाल होते. टिपू सुलतान यांच्यावरील माहिती असलेल्या त्यांच्या India First या पुस्तकाला 26 जानेवारी, 2002 मध्ये श्री एल. के. अडवाणी यांनी त्यांच्या पुस्तकाची प्रस्तावना लिहिली आहे. तत्कालीन वाजपेयी सरकार मध्ये जेंव्हा श्री आडवाणी उप पंतप्रधान झाले त्याच्या साधारण सहा महिन्यापूर्वी ही प्रस्तावना लिहिल्या गेलेली आहे.

    महाराष्ट्रात आज जी चर्चा होत आहे त्या पार्श्वभूमीवर सूज्ञ लोकांनी श्री मलकानी यांच्या लेखणीला जाणून घेतले पाहिजे.

   7 जून, 2023 रोजी जेष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांनी त्यांच्या ट्वीटर हॅंडलवरुन ही संक्षिप्त माहिती देताना सविस्तर माहितीसाठी त्यांनीच लिहिलेल्या डॅक्कन हेराल्ड मधील लेखाची लिंक त्यासोबत दिलेली आहे.

आर एस खनके

0Shares

Related post

नॅशनल स्टॉक एक्सचेंजची (NSE एन एस इ) आकडेवारी:  भारतीय अर्थव्यवस्थेच्या वित्तीयकरणाचा सांगावा !

नॅशनल स्टॉक एक्सचेंजची (NSE एन एस इ) आकडेवारी: भारतीय अर्थव्यवस्थेच्या वित्तीयकरणाचा सांगावा !

नॅशनल स्टॉक एक्सचेंजची (NSE एन एस इ) आकडेवारी: भारतीय अर्थव्यवस्थेच्या वित्तीयकरणाचा सांगावा ! एप्रिल २०२६ पर्यंत…

यादवों को ही धार्मिक षडयंत्र का शिकार क्यों बनाया जाता है?

आजकल हिन्दू धर्म के छ: हजार जातियों में सिर्फ यादव जाति को ही महिमा मंडित करते…
स्टालिनने सत्ता गमावली असेल, पण त्यांनी आपली राजकीय प्रतिष्ठा गमावलेली नाही.

स्टालिनने सत्ता गमावली असेल, पण त्यांनी आपली राजकीय प्रतिष्ठा गमावलेली नाही.

स्टालिनने सत्ता गमावली असेल, पण त्यांनी आपली राजकीय प्रतिष्ठा गमावलेली नाही. तामिळनाडूमध्ये डीएमकेच्या पराभवामागे कोणतीही कारणे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *