• 13
  • 1 minute read

भाजपाच्या वकिलाने बौद्ध महिलेची क्रूर हत्या केली…

भाजपाच्या वकिलाने बौद्ध महिलेची क्रूर हत्या केली…

भाजपाच्या वकिलाने बौद्ध महिलेची क्रूर हत्या केली...

पुणे: चंदननगर भागात बौद्ध महिला पुनम मूण (वय 35 वर्ष) या नराधम एडवोकेट संजय सावंत यांच्या ऑफिसमध्ये तीन वर्षांपासून कामाला होत्या.
16 एप्रिल 2026 रोजी ऑफिसमध्ये सावंत, त्यांची पत्नी व मुलगी यांनी क्रूर हल्ला करून पुनम मूण यांना संपवले.
 
मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मृतदेह पोत्यात भरण्याचा प्रयत्न केला. पीडितेच्या नवऱ्याची दिशाभूल करण्यासाठी, घरी न आलेल्या पत्नीचा शोध घेण्यासाठी तो फिरत असताना, त्याला वेगवेगळ्या ठिकाणी पाठवून त्याची दिशाभूल केली.
 
हल्ला एवढा गंभीर आहे की पीडितेचा चेहरा ओळखू येत नाही. जवळपास 50 ते 56 वार चेहऱ्यावर करण्यात आलेले आहेत. बॅट, कोयता, लोखंडी रॉड, दांडे यांचा वापर करण्यात आलेला आहे. दोन्ही हात मोडण्यात आलेले आहेत. त्यामुळे हे हत्याकांड अतिशय गंभीर असून, तिला हळहळ, कटकारस्थान करून मारण्यात आलेले आहे.
 
ही अतिशय गंभीर घटना असून, या घटनेची यंत्रणेमार्फत चौकशी झाली पाहिजे. आरोपींना फाशीची शिक्षा फास्टट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून तात्काळ झाली पाहिजे. पीडित परिवाराला पोलीस संरक्षण, शासकीय नोकरी आणि आर्थिक मदत दिली पाहिजे. पुनम मूण यांना दोन मुले आहेत; त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी सरकारने घेतली पाहिजे.
 
14 एप्रिल अतिशय आनंदात साजरी करून ती 16 तारखेला ऑफिसला गेली होती. आरोपी हा वकील असून तो दोन नंबरचे प्रकरण करायचा, अशी माहिती कुटुंबाकडून मिळालेली आहे. त्या अनुषंगाने, या आरोपीचे काही मोठी उलाढाल तिला माहिती पडली होती का, किंवा तिला सामूहिक रित्या पाच-सहा लोकांनी संपवले आहे का, अशा पद्धतीचे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. त्यामुळे 15 आणि 16 तारखेला कार्यालयाच्या आजूबाजूचे मोबाईल लोकेशन, व्हिडिओ यांचा आधुनिक पद्धतीने तपास झाला पाहिजे. कोणत्याही राजकीय दबावाला बळी पडता कामा नये. संजय सावंत हा नावाजलेला वकील असल्यामुळे आणि पीडित हे गरीब कुटुंब असल्यामुळे प्रकरण दडपण्याची शक्यता दाट आहे.
 
आरोपी हा भाजपाचा कार्यकर्ता असून भाजपाच्या विधी शाखेचा अध्यक्ष आहे. एकीकडे नारीशक्ती विधेयक नामंजूर झालं म्हणून देशभर भाजपाचे महिला कार्यकर्ते रडत आहेत. हे प्रश्न विचारतो — नवनीत राणा, चित्रा वाघ, नीलम गोरे, तुम्हाला दलित पुनम मूण यांच्या बद्दल रडू का येत नाही? तिला मारणारा भाजपा पदाधिकारी आहे. भाजपा पदाधिकारी दलितांच्या महिलेला मारतात आणि दुसरीकडे भाजपा नारीशक्तीच्या गप्पा मारतो.
 
आरोपी भाजपाचा असल्यामुळे, सरकार भाजपाचे असल्यामुळे, प्रकरण दडपण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. ऑल इंडिया पँथर सेना राज्यभर आंदोलन छेडणार आहे. मी पीडित कुटुंबाची भेट घेतली. लहान लेकरं — छोटीशी मुलगी चौथीत आहे, आणि एक मुलगा नववीत आहे. त्यांच्या शिक्षणासाठी ती काही किलोमीटर जाऊन काम करायची. राज्यसरकारने 25 लाखांची मदत, कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी देण्यात यावी!
 
यावेळी ऑल इंडिया पँथर सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष बाळासाहेब शेंडगे, महाराष्ट्राचे सरचिटणीस जितेश भाई जगताप, विदर्भाचे युवा अध्यक्ष संकेत जाधव, तसेच पुण्याच्या शहराध्यक्ष मनीषाताई कदम उपस्थित होते. 
 
 
0Shares

Related post

माझा शिवबा रं… माझा राजा रं…. यातला आपलेपणाचा गोडवा काळजात येतो.

माझा शिवबा रं… माझा राजा रं…. यातला आपलेपणाचा गोडवा काळजात येतो.

शीर्षकाला समजून घ्यायला पुस्तकातल्या आशयाची जाण असावी लागते ! प्रबोधनकार ठाकरे यांनी प्रबोधनकार यांनी “दगलबाज शिवाजी”…
संविधान बदलण्याची ‘सुनियोजित ब्ल्यूप्रिंट’! भाजपचे एक पाऊल पुढे — लोकशाहीचा आत्मा धोक्यात?

संविधान बदलण्याची ‘सुनियोजित ब्ल्यूप्रिंट’! भाजपचे एक पाऊल पुढे — लोकशाहीचा आत्मा धोक्यात?

संविधान बदलण्याची ‘सुनियोजित ब्ल्यूप्रिंट’! भाजपचे एक पाऊल पुढे – लोकशाहीचा आत्मा धोक्यात? देशाचा राजकीय नकाशा बदलतोय.पण…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *