- 7
- 1 minute read
साट्यालोट्याची भांडवलशाही!
3waysmediadmin
February 2, 2024
Post Views: 27
साट्यालोट्याची भांडवलशाही!
राजकीय नेते आणि कॉर्पोरेट भांडवलदार वेगळे आणि राजकीय नेत्यांनी कॉर्पोरेट भांडवलदार धार्जिणे निर्णय / धोरणे ठरवली तर त्याला आपण क्रोनीझम , साट्यालोट्याची भांडवलशाही असे म्हणतो पण कॉर्पोरेट भांडवलदार स्वतःच पंतप्रधान / राष्ट्राध्यक्ष झाला तर त्याला काय शब्द आहे ? भांडवलशाही नवनवीन रूप धारण करत आहे. आपल्याला आपली परिभाषा विकसित करावी लागेल खालील तीन बातम्या / आकडेवारी बघा
१. लोकसत्ता ( १३ एप्रिल २०२६, पान क्रमांक एक) बातमीनुसार इराणवरील कारवाई सुरू झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या व्यक्तव्यांच्या आणि घोषणांच्या वेळा चर्चेचा आणि विश्लेषणाचा विषय झाला आहे. घोषणांचे वार आणि वेळा अशा निवडल्या जातात की न्यूयॉर्क मधील भांडवल बाजारावर त्यांचा हवा तसा परिणाम होईल.
२. वॉल स्ट्रीट जर्नलने मागच्या जानेवारीत ट्रम्प राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर न्यूयॉर्क मधील एस अँड पी ५०० निर्देशांकाचा मागोवा घेतला. ज्या दहा तारखांना हा निर्देशांक जोरात उसळला, त्यापैकी नऊ तारखांच्या आदल्या दिवशी ट्रम्प यांनी आयताकर किंवा इराण युद्धसंदर्भात घोषणा केलेल्या आहेत. त्याच्या तारखा दिल्या आहेत.
त्या तारखा अशा: २०२५ मधील एप्रिल ९, एप्रिल ११, एप्रिल २२, एप्रिल २४, मे १२, मे १४, मे २७, मे ३१
२०२६ मधील एप्रिल ८
३. ट्रम्प मार्च २०२६ च्या २३ तारखेला त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर सकाळी ७ वाजून ६ मिनिटांनी आपला इराणवरील हल्ले पाच दिवस तहकूब करण्याचा निर्णय जाहीर केला. मार्केट औपचारिक रित्या सुरू होण्याआधी काही काळ प्रिमार्केट व्यवहार होतात. त्याच दिवशी सकाळी ६.५० मिनिटांपासून ७.०६ वाजेपर्यंत पंधरा मिनिटात न्यूयॉर्क स्टॉक मार्केटमधील डेरिव्हेटिक सेगमेंट मध्ये खनिज तेलाचे फ्यूचर कॉन्ट्रॅक्टची मोठ्या प्रमाणावर विक्री झाली. आणि त्या लोकांनी काही मिनिटात भरपूर नफा कमावला होता. ट्रम्प यांच्याबद्दल अशी अजूनही उदाहरणे दिली जातात उदा त्यांचा जावई त्यांच्या अनेक महत्वाच्या निर्णयात / वाटाघाटीत औपचारिक रित्या सामील असतो
डोनाल्ड ट्रम्प स्वतः मोठे रियल इस्टेट आणि इतर व्यवसायात आहेत. त्यांच्या मंत्रिमंडळात अनेक अब्जाधीश कॉर्पोरेट क्षेत्रातील किंवा संबंधित व्यक्ती आहेत.
कोणतेही भांडवल बाजार, आणि अमेरिकेतील तर नक्कीच, राज्यकर्ते, नियामक मंडळ यांच्या महत्वाच्या धोरणात्मक निर्णयांप्रती अत्यंत संवेदनशील असतात. त्यानुसार सक्रिय गुंतवणूकदार आपल्या पोझिशन्स घेतात. मिलियन डॉलर्स स्टेकला लावले जातात. ज्यांना ही माहिती इतरांच्या पेक्षा आधी माहित होते, ते एका फटक्यात भरपूर पैसे कमवू शकतात. याला इन्सायडर ट्रेडिग असे म्हणतात.
ट्रम्प यांच्या राज्यात हे दिनदहाडे / खुले आम सुरु आहे
डोनाल्ड ट्रम्प किंवा त्यांचे मंत्री स्वतः लाभार्थी असण्याची गरज नहीं. त्यांचे कुटुंबीय गेली काही दशके धंद्यात आहेत. त्यांचे इनर सर्कल नफा कमावण्याच्या धंद्यात आहे.
तरुणपणापासून ज्या माणसाने फक्त पैसे, अधिक पैसे कोठे आणि कसे मिळवता येतील या एकाच दृष्टिकोनातून आयुष्य व्यतीत केलेले असेल त्याचे सत्ता पदावर असताना देखील धंदा / व्यवसाय करत असेल तर ती व्यक्ती मंत्री / राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर कशी वागेल ? न्यूट्रल वगैरे शब्दांनी आपल्याला xxx बनवत असतात ही मंडळी तथाकथित विकसित अमेरिकन कॉर्पोरेट / वित्त भांडवलशाही असणाऱ्या अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प नामक व्यक्ती एकतर राष्ट्राध्यक्ष बनते आणि अनेक दशकांचे कायदे , कानू, नियामक मंडळे फाट्यावर मारून मनमानी करते. तेथे हे होत असेल तर आपला देश कायद्याच्या राज्यापासून कोसो दूर आहे असे म्हणावे लागेल
लक्षात ठेवूया की पूर्वी राजाचा मुलगा , राजा मेल्यानंतर किंवा त्याला हटवून राजा बनायचा. लोकशाहीत तर लोक आपले राज्यकर्ते निवडतात. त्यांना mandet देतात की आमच्यातर्फे निर्णय / धोरणे ठरव. चला एकदा जजमेंट चुकू शकते पण तेच तेच लोक पुन्हा पुन्हा मतदार नागरिक निवडून देतात. लोकांनी कोणाला दोष द्यावा , स्वतःला की त्या व्यक्तींना ?
भांडवलदार स्वतः राजकीय नेता आमदार , खासदार , मंत्री झाल्याची उदाहरणे आपल्या भारतात, महाराष्ट्रात देखील अनेक आहेत. काही जण विचारतात तुम्ही अमेरिका / ट्रम्प यांच्याबद्दल पोस्ट लिहिता , त्याचा भारताशी काय संबंध ? अशा पोस्ट भारतीय वाचकांसाठी आहेत का नाहीत हे प्रत्येक वाचकाने ठरवावे
संजीव चांदोरकर
0Shares