डॉ. संजय दाभाडे , पुणे.
9823529505 ,
आदिवासी विकास विभागाने लक्ष्मण मानकर ट्रस्ट/संस्थेसोबत आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांमध्ये विविध उपक्रम राबविण्यासंदर्भात ऑगस्ट २०२५ मध्ये सामंजस्य करार केला आहे. हा करार २०२९ पर्यंत अस्तित्वात असेल. उपलब्ध करारनाम्यानुसार हा उपक्रम मोठ्या प्रमाणावर आदिवासी वसतिगृहांपर्यंत पोहोचणार असल्याचे दिसते……
उद्योजकता विकास कार्यशाळा , करिअर मार्गदर्शन / शिबिर / व्याख्याने , व्यक्तिमत्त्व विकास , शैक्षणिक योजना व शिष्यवृत्ती यांची माहिती , विद्यार्थी विकास मेळावा , स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन , स्पोकन इंग्लिश मार्गदर्शन व्यसनमुक्ती , आर्थिक साक्षरता
महापुरुष जयंतीनिमित्त कार्यक्रम विविध स्पर्धांचे आयोजन , अभ्यास/निसर्ग व पर्यटन सहलींचे आयोजन इत्यादी उपक्रम राबविले जातील असा दावा संस्थेने केलाय….!
मुळात ही संस्था संघाची निगडित संस्था आहे. संघ विचारधारा हा त्यांचा बेस आहे.
प्रशिक्षण , व्यक्तिमत्त्व विकास ह्या गोंडस नावाखाली आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये संघाचे विचार पेरणे , आदिवासी पोरांचे *वनवासीकरण* करणे हे त्यांचे प्रमुख उद्दिष्ट असणार हे वेगळे सांगण्याची अजिबात गरज नाही.
आम्ही काहीच मोबदला व शुल्क न घेता हे उपक्रम राबवणार आहोत हा त्यांचा दावा अत्यंत खोटारडा आहे.
ह्या उपक्रमांमुळे सुमारे ५५ हजार आदिवासी मुलांसोबत त्यांचा जवळचा संबंध व संपर्क येऊन ते त्या विद्यार्थ्यांवर प्रभाव टाकून संघोटी विचारधारा लादणार हे नक्की.
*ह्यापेक्षा अधिक नी भयंकर मोबदला आणखी काय असू शकतो…..?*
माझे त्या करार बद्दल प्रमुख *५* आक्षेप आहेत हे मी नमूद करतो……..
१) ती संस्था जी कामे करणार आहे ती सर्व कामे trti करू शकते किंबहुना ते trti चे कर्तव्य देखील आहे.
२) मानकर ट्रस्ट हा शंभर टक्के संघाचा आहे व ते वरील प्रोग्राम्स राबवत असताना विद्यार्थ्यांवर विलक्षण प्रभाव टाकतील व विद्यार्थ्यांचे ब्राह्मणीकरण ( ब्राह्मणी हिंदुत्व ) करण्यासाठी ह्या संधीचा फायदा घेतील.
हाच त्यांचा प्रमुख लाभ असेल असे आमचे स्पष्ट मत व म्हणणे आहे.
३)एखाद्या खासगी व तेही विशिष्ट विचारसरणी बाळगणारया संस्थेला हे काम देणे योग्य वाटत नाही व trti ही शासकीय संस्था अस्तित्वात असताना त्या खासगी संस्थेला ते काम करण्यास व वसतिगृहात शिरकाव करण्यास परवानगी देणे ठीक नाही.
४) आमचे महापुरुष आणि आमच्या संस्कृतीचे धडे आता आम्हाला वनवासी म्हणून हिणवणारे संघोटे शिकवणार आहेत का….?
५) आदिवासी होस्टेलच का निवडलेत….?
दलित मुला – मुलींची समाज कल्याण विभागाची हॉस्टेल वर ही मेहेरबानी का करत नाहीत….??
तिथे जाण्याची आवश्यकता का वाटत नाही , हिम्मत का होत नाही…..???
जो प्रयोग मानकर संस्था आदिवासी वसतिगृहांत करू इच्छिते तोच प्रयोग सामाजिक न्याय विभागातील दलित विद्यार्थ्यांवर करण्याची डाळ का शिजली नाही हा प्रश्न आदिवासींनी विचारला पाहिजे.*
आदिवासी मित्र – मैत्रिणींनो , हे सवाल तुम्ही उपस्थित करणार आहात की नाही…..?
आदिवासींवर हे सांस्कृतिक संकट व हल्ले किती सहन करायचे….?
जोहार….. जय आदिवासी…..
डॉ. संजय दाभाडे , पुणे.
9823529505